Farm workers are not available for farm work due to corona  
नागपूर

कोरोनामुळे यंदा शेतीही येणार संकटात, शेतात काम करायला मजुरच नाहीत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले असून शेतीवरही याचा परिणाम होणार असल्याचे दिसते. शेतीचा कामाचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु कामे करण्यासाठी मजूरच मिळत नसून इच्छुकांना पोलिस घराबाहेर पडून देत नसल्याचे यंदा शेतीही संकटात येण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही वर्षात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा तर सुरुवातीपासूनच संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा माल घरातच पडून आहे. खरीपसोबत रब्बीचा मालही घरीच आहे. सरकारने घालून दिलेल्या निर्बंधामुळे त्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. पैसा नसल्याने शेती करायची कशी, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गावखेड्यात कोरोनापेक्षा पोलिसांची दहशत जास्त आहे. त्यांच्या दहशतीमुळे लोक घरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. काही मजुर लॉकडाऊनमुळे घराकडे परतले आहेत. काहींनी वखरणीचे काम सुरू करण्याचे धाडस दाखविले. परंतु, शेती कामासाठी मजूरच मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतातील कचरा पडून आहे. मजूर नसल्याने शेतीचे कामे रखडली आहेत. उमरेड तालुक्‍यातील बेला गावातील शेतकऱ्याने सांगितले की, मजूर मिळत नसल्याचे यंदा शेतीची कामे करणेच शक्‍य नाही. पोलिसही बाहेर जावू देत नाहीत. त्यामुळे पहाटेच्या सुमारासच शेतीतील कचरा, तण, पराटी उपटण्यासाठी जावे लागते आणि 9 च्या आतच घराकडे यावे लागते. एका शेतकऱ्याने सांगितले की, मजूर पोलिसांच्या भीतीने येण्यास तयार नाही. ज्यांची शेती गावापासून दोन, चार किलोमीटरवर आहे, त्यांची अडचण होत आहे.

मजुरांनी सातबारा कुठुन आणावा?

सरकारने शेती कामाला सुट दिली. त्यासाठी सातबारा असणे आवश्‍यक आहे. सातबारा दाखविल्यावरच संबंधितांना जाऊ देण्यात येते. परंतु मजुरांकडे सातबारा नाही. त्यामुळे शेतीचे काम करण्यासाठी त्यांना बाहेर पडता येत नाही. अशा लोकांनी सातबारा कुठुन आणावा, हा मोठा प्रश्‍न आहे. मजुरांअभावी शेतीचे काम प्रभावित होत आहे.

ठेक्‍याने शेती करणाऱ्यांची अडचण

अनेकांकडे शेती नसून ठेक्‍याने ते इतरांची शेती करतात. ठेक्‍याने शेती करणाऱ्यांचा वर्गही मोठा आहे. त्यांच्याकडे सातबारा नाही. अशा लोकांचीही यंदा अडचण होत आहे.

तलाठी नाही, सातबारा मिळणार कसा ?

लॉकडाऊनमुळे तलाठी कार्यालयात तलाठी नाही त्यामुळे शेतकऱ्याला सातबारा मिळणे अवघड झाले आहे. सातबारा नसल्याने शेतकऱ्याचे सर्व काम ठप्प झाले असून कर्ज ही मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश

धक्कादायक! नगरसेवकानेच केला तिघांवर कोयत्यानं हल्ला, २० जणांवर गुन्हा दाखल; पंढरपुरातील घटनेनं खळबळ

Pune News: नवले पुलावर आता आधुनिक पहारा; पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले सीसीटीव्ही, हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या वर्धापनादिनानिमित्त देशभरातील कार्यकर्त्यांना दिल्या शुभेच्छा !

Pune News: बीजविरहित द्राक्षांचे जनुकीय गुपित उलगडले; पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे यश

SCROLL FOR NEXT