father himself hatched conspiracy to kidnap child Police vigilance and CCTV revealed crime nagpur sakal
नागपूर

Crime News : पित्यानेच रचला मुलाच्या अपहरणाचा कट

पोलिसांची सतर्कता व सीसीटीव्हीने बनाव उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दारूड्या पित्याने आपल्या ७ वर्षाच्या मुलाला मैत्रिणीसोबत पाठविले. मात्र, बरेच तास उलटल्यानंतर ती मुलाला घेऊन आली नाही. पित्याने अपहरणाचा कांगावा करीत तक्रार नोंदविली. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी करीत सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सर्व प्रकार उघडकीस आणत पित्याचा हा बनाव समोर आणला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आकाश वाघोडे हा बांधकाम मजूर असून दारूडा आहे. दारू पिण्यावरून घरात वाद होत असल्यामुळे त्याची पत्नी ७ वर्षीय मुलाला घेऊन माहेरी गेली. तेव्हापासून जास्त दारू पित होता. त्याच्याच बांधकामावर मजूर असलेल्या ३५ वर्षीय महिलेशी त्याचे सूत जुळले. पत्नी सोडून गेल्यामुळे एकटा राहणाऱ्या आकाशच्या घरी ती नेहमी येत होती. तिलाही दारूचे व्यसन आहे. दोघेही नेहमी दारू पिऊन एकाच घरात राहत होते.

मंगळवारी आकाशने त्याच्या ७ वर्षीय मुलाला घरी आणले होते. त्याच रात्री त्याची मैत्रीणसुद्धा घरी आली. दोघांनीही रात्रीच्या सुमारास दारू प्यायली. सकाळी उठून मैत्रीण आकाशने सांगितल्याप्रमाणे मुलासह माहेरी छिंदवाडा-मध्यप्रदेश निघून गेली. ती सायंकाळी परत येणार होती. परंतु, न आल्यामुळे आकाशने मुलाचे अपहरण मैत्रिणीने केल्याची तक्रार बेलतरोडी पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे बेलतरोडीचे ठाणेदार चंद्रकांत यादव, एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांचे पथक महिलेचा शोध घेत होते.

रेल्वेस्थानक आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात ती महिला मुलाला घेऊन बसमध्ये चढताना दिसत होती. बुधवारी ती मुलाला घेऊन नागपुरात आली. शताब्दी चौकातून जात असताना पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या पथकाला ती महिला आणि मुलगा दिसला. तिला ताब्यात घेऊन बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, विजयकांत सागर, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, एएचटीयूच्या सहायक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, महेंद्र पाटील, राजेंद्र अटकाळे, नंदकिशोर तायडे, मनीष पराये, गोपाल देशमुख, ज्ञानेश्वर, हेमंत पराते यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT