Nagpur Medical College sakal
नागपूर

Nagpur Medical College : नागपूर मेडिकलमध्ये ७७ हजार बनावट गोळ्यांचे वाटप

Nagpur Medical College : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘रिक्लेव्ह ६२५’ या अँटिबायोटिक औषधाच्या ७७ हजार बनावट गोळ्यांचे रुग्णांना वाटप झाल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)मध्ये ‘रिक्लेव्ह ६२५’ ही अँटिबायोटिक औषधी बनावट असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए)च्या तपासणीत उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

महत्त्वाचे म्हणजे जवळपास ७७ हजार या बनावट औषधांचे रुग्णांचे वाटपही करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अँटिबाटिक असलेल्या ‘रेसीफ-५००’ नावाच्या औषधात ‘सिप्रोफ्लोक्सासिन’ नावाचा घटक असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. नागपूरच्या ‘एफडीए’ने नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या औषध भंडारातील हा बनावट औषधींचा पर्दाफाश केला.

गुजरात येथील ‘रिफायंड फार्मा’ नावाच्या कंपनीने हे औषध असले तरी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पाच जण तुरुंगात आहे. हे प्रकरण ताजे असताना आता मेडिकलच्या औषध भंडारातून ‘रिक्लेव्ह ६२५’ या अँटिबायोटिक औषधीही बनावट असल्याचे ‘एफडीए’च्या तपासणीतून पुढे आल्याने एकच खळबळ माजली आहे.

यामुळे या पुरवठादारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. सोबतच बंद असलेल्या कंपनीची औषधी मेडिकलमध्ये कशी आली, त्याची तपासणी संबधितांनी केली नव्हती असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : महाकालेश्वर मंदिर परिसराच्या जवळ सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान विशाल शिवलिंग सापडले

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT