financial debate between Nagpur ZP officers over buying of garbage vehicle  
नागपूर

नागपूर जिल्हा परिषदेत कचरागाडी खरेदीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; राजकारणासोबतच 'अर्थकारण' सुरू 

निलेश डोये

नागपूर : १५ वा वित्त आयोगांतर्गत कचऱ्याची उचल करण्यासाठी गाडी खरेदी करायची आहे. त्यावरुन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला असल्याची खळबळजनक माती पूढे आली आहे. एका पदाधिकाऱ्याने चक्क गाडीची किंमतच वाढविण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदचे पैसे वाचविण्यापेक्षा खर्च करण्यात अधिक रस असल्याची टीका होत आहे.

१५ व्या वित्त आयोगातून नागपूर जिल्हा परिषदेला एका टप्प्यात ३६ कोटी प्रमाणे तीन टप्प्यातील निधी प्राप्त झाला आहे. यातील १० टक्के निधी जि.प. व १० टक्के निधी पंचायत समिती तर ८० टक्के निधी ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारे मिळणार आहे. ही निधी खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या. 

यानुसार आरोग्य, स्वच्छता व पाणी पुरवठ्यावर भर द्यायचा आहे. गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गाडी खरेदी करायची आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने कचरा गाडीचा खरेदीचा प्रस्ताव तयार केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावणे दोन लाख रुपये प्रती गाडी खर्चाचा आराखडा तयार केला. या गाडीची सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्यांकडून पाहणीही करण्यात आली. परंतु या गाडीच्या किमतीवर एका पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. 

स्थायी समितीच्या बैठकीत यावरून चांगलाच वादंग निर्माण झाला. संबंधित पदाधिकाऱ्याने गाडीची किंमत फारच कमी असून यापेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदीचा प्रस्ताव तयार करायला लावला. परंतु विभागाकडून त्याला विरोध करण्यात आला. त्यांना एक सदस्यानेही साथ दिल्याची माहिती आहे. 

संबंधित सदस्य कॉंग्रेस गटातील नसल्याचे सांगण्यात येते. अध्यक्षांनी गाडी खरेदीस हिरवी झंडी दाखविली असली तरी संबंधित पदाधिकाऱ्याने त्यास लाल झंडी दाखविली. त्यांच्या सर्कलमध्ये हे वाहन खरेदी करणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अध्यक्षांच्या अंतर्गत येत असल्याने जिल्हा परिषदेत कुरघोडीचे राजकारण सुरू असून सर्व काही ‘अर्थकारण’चा भाग असल्याची चर्चा रंगली जोरात रंगली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

LPG Cylinder Rules 2026 : १ मे पासून एलपीजी गॅसचे नियम बदलणार, कधी बुक करता येईल सिलिंडर? महत्त्वाची अपडेट समोर

१३२ किलोवरून थेट ६५ किलोवर! फू बाई फू फेम आरती सोलंकीनं पाणी पुरी खाऊन बदलल्या 'या' सवयी

Latest Marathi News Live Update : कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या राज्यव्यापी संपात वणीतील विक्रेते सहभागी

SCROLL FOR NEXT