fire at agro company in nagpur hingana midc 2 workers died 20 to 30 workers feared to be trapped  
नागपूर

Nagpur Fire News : नागपूरमध्ये अ‍ॅग्रो कंपनीला भीषण आग! तीन कामगारांचा मृत्यू

रोहित कणसे

Nagpur Fire News : नागपूरमध्ये अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शहरातील हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली. या दुर्घटनेत तीन कामागरांचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसीतील  कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीला सोमवारी अचानक  आग लागली. या आगीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आगीमुळे आसपासच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते. दरम्यान या आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या ही आग नियंत्रणात आली आहे.

दरम्यान या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. फडणवीसांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या तीन कामगारांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT