SBI Bank
SBI Bank esakal
नागपूर

Chandrapur SBI Scam : एसबीआयचे ५ अधिकारी फरार

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : बिल्डर, एजंट आणि भारतीय स्टेट बॅंकेचे अधिकारी यांनी संगनमताने तब्बल ४४ जणांना मूल्यांकनापेक्षा अधिकचे कर्ज देऊन बँकेची १४ कोटी २६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला. यात एकूण १५ जणांना अटक करण्यात आली. अटकेतील १२ कर्जदारांना न्यायालयाने बुधवारी (ता. २) जामीन दिला; तर, तीन बॅंक अधिकारी आणि अधिकाऱ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान अटकेच्या भीतीने एसबीआयचे पाच अधिकारी फरार झा आहेत.

बँकेच्या मुंबईचे दोन आणि नागपूर शाखेतील एका अधिकाऱ्याच्या अटकेसाठी मंगळवारी एक पथक रवाना झाले. मात्र त्यांच्या हाती अद्याप फरार अधिकारी लागले नाही. याप्रकरणात शहरातील नामांकित डीएसके ग्रीन, सीनर्जी व देऊळ या बिल्डरांची नावे समोर येत आहेत. चंद्रपूर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर यांच्याकडे ४४ कर्जधारकांनी गृहकर्ज घेण्यासाठी बनावट आयकर रिटर्न तयार करून एजंटमार्फत अर्ज सादर केले. या प्रकरणाची नियमानुसार पडताळणी झाली नाही व मूल्याकंनापेक्षा अधिकच्या कर्जरकमेचे वाटप करण्यात आले. या कर्जधारकांमध्ये मजूर व छोट्या मोठ्या व्यवसायिकांचा समावेश आहे.

दिलेल्या कर्जांच्या तपासणीत बँकेला एकूण १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळए पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी बँकेचे चंद्रपुरातील बापट नगर शाखेचे एटीएम व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, कवठाळा बँकेचे व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडीट व्यवस्थापक देविदास कुळकर्णी या अधिकाऱ्यांसह, एजंट व कर्जधारकांना अटक करण्यात आली आहे. या तिघांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

स्टेट बँकेच्या नागपूर मुख्य शाखेतील व्यवस्थापक उज्ज्वल शेळके फरार आहेत. दरम्यान कर्जधारक श्वेता रामटेके (वय ४२, रा. बाबूपेठ), वंदना विजयकुमार बोरकर (४०, रा. नगिनाबाग), योजना तिरणकर (४२, म्हाडा कॉलनी), शालिनी रामटेके (४५, भद्रावती), मनीषा बोरकर (४०, भद्रावती), वृंदा आत्राम (४९, बोर्डा), राहुल रॉय (३६, रा. माजरी), गजानन बंडावार (३९, रा. धाबा), राकेशकुमार सिंग (४२, रा. सास्ती), गणेश नैतम (३६, रा. कोसारा), गीता जागेट (५३, रा. घुग्घुस) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

व्याप्ती वाढणार

या प्रकरणाची व्याप्ती वाढून आणखी काही जणांची नावे समोर येण्याची व बॅंकेच्या फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डिएसके बिल्डर्सच्या एकाच सदनिकेत एक प्लॅट २९, तर दुसरा ५१ लाखांचा दाखविण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंड सुप्रीम ठाकूर अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. डीएसकेच्या कपिल वैरागडे याला पोलिसांनी बयानासाठी बोलविले होते. मात्र त्याला अटक केली नाही, असे कर्जदारांचे म्हणणे आहे. आमच्याकडून बिल्डर्सनी कागदपत्र घेतली. कर्ज किती मंजुर झाले सांगितले नाही. फक्त बॅंकेत बोलावून स्वाक्षऱ्या घेतल्या, असे कर्जदारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT