Flight Ticket Price Sakal
नागपूर

Flight Ticket Price : दुबईपेक्षा देशांतर्गत विमान प्रवास महाग; ५० ते ६० टक्के भाडेवाढ, पर्यटकांना उन्हाळ्यात दरवाढीचे चटके

नागपूरवरून दुबईला जाणे स्वस्त आहे मात्र, श्रीनगर, लद्दाख, गुवाहाटी, सिक्कीमला जाणे महागात पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : उन्हाळी पर्यटनाला बुस्ट मिळालेला असताना विमानांची संख्या कमी आणि प्रवासी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विमानप्रवास तब्बल ६० टक्क्यांनी महागला आहे.

त्याचा सर्वाधिक फटका देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना बसत आहे. नागपूरवरून दुबईला जाणे स्वस्त आहे मात्र, श्रीनगर, लद्दाख, गुवाहाटी, सिक्कीमला जाणे महागात पडत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांना दरवाढीचे ‘चटके’ सहन करावे लागणार आहेत.

श्रीनगर, लेह, लडाख, सिक्कीम, गुवाहाटी यासह इतरही पर्यटनस्थळी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तुलनेत विमानांची संख्या कमी आहे. देशातील काही प्रमाणात विमानांचे मार्गदेखील कमी झाले आहेत. तसेच अन्य पर्यटन स्थळीदेखील जाणाऱ्या प्रवाशांचा ओढा जास्त आहे. त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. सामान्य दराच्या तुलनेत सुमारे ५५ ते ६० टक्के दरवाढ केली आहे.

असे आहेत दर...

देशाबाहेरील दर

नागपूर ते दुबई : २५ हजार ५००

नागपूर ते सिंगापूर - २५ हजार

देशांतर्गत दर

नागपूर ते श्रीनगर : ३५ हजार

नागपूर - लद्दाख - ४० हजार

नागपूर - गुवाहाटी - ३० हजार

नागपूर- सिक्कीम - ३५ हजार

(हे दर अंदाजे प्रति व्यक्ती परतीच्या प्रवासासह आहेत.)

नागपूर - बंगळुरू - ५ हजार ५००

नागपूर - मुंबई - ६ ते आठ हजार

नागपूर - अहमदाबाद - ६ हजार

(हे दर प्रतिव्यक्ती एकेरी मार्गाचे आहेत)

तिकीट दरवाढीची कारणे

  • फ्लाइट कमी अन प्रवासी जास्त

  • देशात एकूण विमानांची संख्या ७१३, पैकी २०० विमाने सेवेत नसलेली

  • प्रवासी वाहतुकीत विमानांची संख्या कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT