कळमेश्‍वरः पुरामुळे कोसळलेली पालिकेने बांधलेली तलावाची संरक्षक भिंत. 
नागपूर

पुराचे पाणीच रोखू शकत नाही, ती कसली बरे संरक्षक भिंत?

चंद्रकांत श्रीखंडे

कळमेश्वर (जि.नागपूर):  नगरपरिषद कळमेश्वर-ब्राह्मणीच्या वतीने शहर सौंदर्यीकरणावर लाखोंचा खर्च केला जात आहेत. बुधवारी (ता.५) आलेल्या पावसाच्या पुरामुळे नाल्यावर बांधलेली संरक्षण भिंतच चक्क वाहून गेल्याची घटना घडली असून यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधिक वाचा  : सहारा देता येत नसेल तर देऊ नका, पण तिरस्कार तरी करु नका हो...

पालिका प्रशासनाच्या बांधकामाची पोलखोल
पालिका प्रशासनाच्या वतीने ‘तळ्याची पार’ हनुमान मंदिर परिसरात शहर सौंदर्यीकरणाचे काम गेल्या दशकापासून सुरु आहे. यात अंतर्गत बगीचा, उद्यान, जलतरण तलाव, ग्रीन जीम आदींची कामे अद्यापर्यंत सुरु आहेत. यावर लाखोंचा खर्चही केला जात आहे. बुधवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर येवून दहा वर्षाआधी बांधलेली नाल्यापासून सुमारे दहा फूट बाजूला असलेली संरक्षण भिंतच नाल्यात कोसळल्याची घटना घडली. यामुळे पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अधिक वाचा : कोविडमधून परतला, खूनप्रकरणात अडकला; दोन अधिकाऱ्यासह चार पोलिस पॉझिटिव्ह

निधीची होतोय दुरूपयोग
कळमेश्वर शहर सौंदर्यीकरणाचा एक भाग असलेल्या ‘तळ्याची पार’ येथील तलाव सौंदर्यीकरण, बगीचा, बालोद्यान, जलतरण तलाव, फुटपाथ, आाकर्षक लाईटिंग, लॉन, ग्रीन जीम, वृक्षारोपण आदी कामांवर गेल्या दशकापूर्वीपासूनचा दरवर्षी लाखो रुपयांचा मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. यामुळे शहर सौंदर्यीकरणात भरही पडत आहे. या बांधकामाकरिता पालिकेला शासनाच्या विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात फंडही प्राप्त झालेला आहे व होत आहे. परंतू नगर पालिका प्रशासनाच्या  अयोग्य नियोजनामुळे होवू घातलेल्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अधिक वाचा  :  ‘यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या झाल्यास सरकारसोबत संघर्ष’; कोणत्या मोठ्या नेत्याने केले हे वक्तव्य, वाचा सविस्तर

बांधकाम विभागाचे धिंडवडे
अनेक बांधकामांना आतापासूनच तडे गेलेले बघायला मिळते. जलतरण व बगिच्याचे अद्यापपर्यंत लोकार्पणही झाले नाही, हे विशेष. यावर्षी आलेल्या पहिल्याच पुरात  नाल्याची संरक्षण भिंतच वाहून गेली. जवळपास पालिका प्रशासनाचे यात दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची  प्राथमिक माहिती असून या संरक्षण भिंतीलगत वृक्षारोपण, लॉन, शोभेची झाडे, जलवाहिन्या व ग्रील्स लावण्यात आलेल्या होत्या. त्याही वाहून गेल्या आहेत. परंतू यावर्षीच्या पहिल्याच पावसाच्या पुरामुळे नगरपरिषद पालिकेच्या बांधकाम विभागाचे धिंडवडे निघाले.
 
संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT