Four arrested along with Don Santosh Ambekar's Nephew 
नागपूर

मोठी बातमी... डॉन आंबेकरच्या ‘राईट हॅंड’सह चौघांना अटक, यांनी केली ही कारवाई

अनिल कांबळे

नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा भाचा सनी वर्मा याच्यासह मुंबईतील तीन ड्रग्स पॅडलर्स यांना क्राईम ब्रॅंचने अटक केली. आरोपींच्या कारमधून ड्रग्ससह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईतील ड्रग्स पॅडलर युवतीसह तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉन संतोष आंबेकर याचे सर्व अवैध धंदे सांभाळणारा ‘राईट हॅंड’ अशी ओळख असलेला सनी ऊर्फ विकास राजकुमार वर्मा (रा. दारोडकर चौक) हा ड्रग्स विक्रीत उतरला होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांना टीप मिळाली. त्यांनी एनडीपीएस पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनीष गावंडे आणि पथकाला कारवाईचे आदेश दिले. 

सनी वर्मा हा मुंबईतील ड्रग्स तस्कर बरकत अली निसार खान (गोवंडी, मुंबई), शेख अकबर अली शौकत अली (गोवंडी, मुंबई) आणि सिराज अब्दूल सत्तार खान (गोवंडी, मुंबई) यांच्यासोबत कारने मुंबईतून वाडीमार्गे नागपुरात येत होता. पीएसआय मनीष गावंडे यांनी मंगळवारी सायंकाळी वाडा-नवीन काटोल नाका रिंग रोडवर सापळा रचला. सनी कारने भरधाव नागपुरात येत असल्याचे दिसताच घेराव घातला. 

सनीसह तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. कारची झडती घेण्यात आली. कारमध्ये १८२ ग्रॅम एमडी ड्रग्स (किंमत ५ लाख ४६ हजार), चार महागडे मोबाईल (किंमत १ लाख ७२ हजार) आणि कार (किंमत ८ लाख) असा एकूण १५ लाख १५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. उपाध्याय. सहआयुक्त डॉ. नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात एनडीपीएस पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनीष गावंडे, राजकुमार देशमुख, राजेंद्र बघेल, अजय ठाकूर, प्रदीप पवार, सतीश निमजे आणि नरेश शिंगणे यांनी केली.

मुंबईतील ड्रग्स पॅडलर रडारवर


एमडी ड्रग्स विक्रीचे मोठे रॅकेट मुंबईत आहे. मुंबईतील हिना शाह, सुफियान इब्राहिम (गोवंडी, मुंबई) आणि नागपुरातील आशिष सुरेश गायकी हे पॅडलर म्हणून काम करतात. यांच्याविरूद्ध गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
 

कोण आहे सनी ?


कुख्यात डॉन संतोष आंबेकर याच्या गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठा मोहरा म्हणून सनी ओळखल्या जातो. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात बलात्कार, दरोडा, गॅंगवार, घरफोडी, छेडखानी, पिस्तूल-तलवार अशी शस्त्रे वापरणे तसेच गांजा, ड्रग्स विकण्यासारखे गुन्ह्याचा समावेश आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT