Fraud sakal media
नागपूर

एमबीबीएसला प्रवेशाच्या नावावर फसवणूक; मास्टरमाईंडला अटक

रॅकेटचा मास्टरमाईंड नरेंद्र इंगळे याला न्यायालयात हजर करण्यात आले.

अनिल कांबळे

नागपूर : एमबीबीएसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याची बतावणी करून अनेक पालकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. त्या टोळीचा मास्टरमाईंट नरेंद्र लक्ष्मण इंगळे याला अटक करण्यात आली आहे. त्याने आतापर्यंत शेकडो पालकांना एमबीबीएसच्या नावावर लाखो रुपये उकळल्याची माहिती आहे.

मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न अनेकांचे असते. त्यांना हेरूनच एमबीबीएसला ॲडमिशन करून देण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा फंडा हे रॅकेट देत होते. अशा प्रकारे या रॅकेटने पालकांकडून कोट्यवधी रुपये हडपले आहेत. पोलिसांकडून अशा रॅकेटच्या भंडाफोड करण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे हे रॅकेट सुसाट झाले होते. आरोपी नरेंद्र लक्ष्मण इंगळे (गुलमोहर अपार्टमेंट, कामठी रोड, टेकानाका) हा पुन्हा सक्रिय झाला होता.

फिर्यादी सुनील प्रल्हाद नागपुरे (यवतमाळ), किशोर मेश्राम आणि रवींद्र वाघमारे (वर्धा) यांना त्यांच्या पाल्याची ॲडमिशन एमबीबीएसला करून देतो. त्याबदल्यात ५० ते ६० लाख रुपये फी आणि डोनेशनच्या नावाखाली आपल्याला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले होते. मात्र, नागपुरे, मेश्राम आणि वाघमारे यांना नरेंद्र इंगळे हा तोतया असल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने इंगळेच्या सीताबर्डीतील कार्यालयात छापा घातला. एक लाखांची रोकड स्वीकारताना त्याला ताब्यात घेतले. इंगळेकडून एक लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, लॅपटॉप, तीन मोबाईल असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी केले आवाहन

रॅकेटचा मास्टरमाईंड नरेंद्र इंगळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने किती जणांची फसवणूक केली आणि त्याच्या रॅकेटमध्ये आणखी किती सदस्य आहेत, याचा तपास पोलिस करीत आहेत. अशा प्रकारे ज्यांची कुणाची फसवणूक झाली असेल त्यांनी गुन्हे शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही डीसीपी चिन्मय पंडित यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT