Crime News :  esakal
नागपूर

Crime News : बनावट करारनाम्याच्या नावावर फसवणूक

यावेळी दुसऱ्याच्या जमिनीचे त्याने जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केले

सकाळ डिजिटल टीम

नागपूर ः यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मौजा खैरी येथील जमिन दाखवीत, ती स्वतः असल्याचे सांगून बनावट कागदपत्र आणि करारनाम्यातून अठरा जणांची दोघांनी फसवणूक केली. याप्रकरणी नईम अब्दुल गनी (वय ४९, रा. एकता कॉलनी, यशोधरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद शाहीद वल्द मोहम्मद वकील अंसारी (वय ३६, सुरा मस्जिदजवळ, संघर्षनगर), वाहीद अख्तर वल्द मोहम्मद आमीर अंसारी (वय ३६, रा. पवननगर, टिपू सुलतान चौक, यशोधरानगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये दोघांनीही संघर्षनगरात बाबा ताजुद्यीन अॅण्ड डेव्हलपर्स नावाचे ऑफीस थाटले. त्यातून त्यांनी मौजा खैरी येथे ले-आउट टाकल्याची बतावणी केली. यावेळी दुसऱ्याच्या जमिनीचे त्याने जमिनीचे बनावट कागदपत्र तयार केले. ते कागदपत्र नईम अब्दुल गनी यांना दाखविले.

नईम यांनी त्यातील १ हजार २५० चौरस फुटाचा प्लॉटचा खरेदी करण्याचा सौदा केला. त्यासाठी त्याने मोहम्मदला ६ लाख १४ हजार २८० रुपये दिले. याशिवाय इतर १७ जणांनी ४९ लाख ३९ हजार २८० रुपये देत प्लॉटची खरेदी केली. दोघांनीही प्लॉट खरेदी करणाऱ्यांना करारनामा करून दिला. मात्र, त्यानंतर त्याच्याकडे ग्राहक सातत्याने रजिस्ट्री करून देण्यासाठी तगादा लावला. मात्र, त्याने रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यायाप्रकरणी नईम यांनी दिलेल्या तक्रार आणि इतरांच्या अर्जाच्या आधारे चौकशी करीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत, दोघांचाही शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT