ganesh sakal
नागपूर

Ganesh Festival : ‘पीओपी’ चे पितळ उघडे ; विक्रेत्यांच्‍या विरोधात गणेश भक्त तक्रारीच्या तयारीत

गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात १ लाख ४४ हजार गणेश मूर्तीचे विसर्जन झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अनेक दुकानदारांनी मातीची मूर्ती सांगून पीओपी मूर्ती विक्री केल्याचे पुढे येत आहे. विसर्जनानंतर दोन दिवसांनीही मूर्ती पाण्यात विरघळली नसल्याने विक्रेत्यांनी फसवणूक केल्यामुळे गणेश भक्तांमध्ये संताप असून पोलिस तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रेत्यांना यंदा अद्दल घडण्याची शक्यता बळावली.

गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात १ लाख ४४ हजार गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात अनेकांनी विसर्जन केले. परंतु काहींनी घरीच विसर्जन करण्यास पसंती दिली. विसर्जनानंतर दोन दिवसांमध्येही मूर्ती न विरघळल्याने विक्रेत्याकडून फसवणूक झाल्याचे घरी विसर्जन करणाऱ्यांच्या लक्षात आले आहे. यातील काहींनी आता पोलिस तक्रार किंवा महापालिकेकडे तक्रार करता येईल काय, याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

शहरातील चतुर्वेदी कुटुंबासोबत ही फसवणुकीची घटना घडली. त्यांना एका विक्रेत्याने मातीची मूर्ती असल्याचे सांगितले. मूर्ती सुंदर असल्याने चतुर्वेदी कुटुंबीयांनी ती खरेदी केली. दहा दिवस श्रद्धेने पूजा केली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाहेर कृत्रिम तलावात विसर्जन करण्याऐवजी चतुर्वेदी कुटुंबीय दरवर्षी घरीच विसर्जनाला प्राधान्य देत आले आहे. यंदाही त्यांनी घरीच विसर्जनाची तयारी केली. घरीच त्यांनी पाण्याने भरलेल्या टबमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

गणरायाचे आगमन, दहा दिवस स्थापना, पूजा आदीमुळे घरात आनंदी वातावरण होते. परंतु मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसल्याने त्यांना धक्काच बसला. दोन दिवसानंतरही मूर्ती विरघळली नसल्याने विक्रेत्याने फसवणूक केल्याची बाब पुढे आली. कुटुंबातील एका सदस्याने संंबंधित विक्रेत्याची माहिती काढून त्याला फोन केला. परंतु त्याने मुजोरी सुरू केली. त्यामुळे संतप्त चतुर्वेदी कुटुंबीयांनी पोलिसांकडेही याबाबत तक्रार करता येईल काय, याबाबत चौकशी केली. येत्या काही दिवसांत अनेकांकडून अशाप्रकारच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता बळावली आहे.

महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनीही अशा घटनांमध्ये पोलिस तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. महापालिकेने केलेल्या बंदीमुळे व मातीच्या मूर्तीच्या जनजागृतीमुळे या वर्षी केवळ सात हजार पीओपी मूर्ती विसर्जित झाल्या. त्याही ग्राहकांनी नकळत घेतल्याचे आता पुढे येत आहे.

मूर्ती विक्रेत्यांनी मातीची सांगून पीओपी मूर्ती देत फसवणूक केली असल्यास बिल किंवा विक्रेत्याकडून मूर्ती घेतानाचा फोटो असेल त्यांच्याविरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार करावी. याबाबत महापालिकाही फसवणूक झालेल्या नागरिकांना मदत करण्यास तयार आहे.

- डॉ. गजेंद्र महल्ले,

उपायुक्त व संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT