girl found in house of boyfriend in Nagpur parents did FIR against boy  
नागपूर

मध्यरात्रीनंतर अचानक गायब झालेली मुलगी सापडली प्रियकराच्या घरात; आई-वडिलांनी उचललं कठोर पाऊल   

अनिल कांबळे

नागपूर ः मध्यरात्रीनंतर मुलगी घरात नसल्याचे लक्षात येताच आईवडिलांना शोधाशोध सुरू केली. शेजारी राहणाऱ्या युवकाच्या घरी विचारपूस करण्यास गेले असता मुलगी तेथे चक्क झोपलेली दिसली. आईवडीलांनी मुलीसह पोलिस स्टेशन गाठले. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

बादल प्रमोद गोस्वामी (२१, अमरनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही वानाडोंगरीतील एका सायन्स कॉलेजला अकराव्या वर्गात शिकते. फेसबुकवर तिची बादलसोबत ओळख झाली. बादलने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. बादल हा वस्तीतच राहत असल्याने तिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांचे व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटिंग सुरू झाले. 

रिकामटेकडा असलेल्या बादलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. डिसेंबर २०१९ मध्ये ती केवळ १५ वर्षांचीच असताना तिला घरी कुणी नसताना बादलने आपल्या घरी बोलावले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिला धमकी देऊन वाटेल तेव्हा बोलवित होता. रविवारी मध्यरात्रीनंतर दोघांची भेट ठरली. मुलीने घरातील सर्वांना झोपल्यानंतर बादलचे घर गाठले. एकाच खोलीत दोघेही पहाटेपर्यंत होते. 

दरम्यान, मुलगी बेडवर नसल्याने तिच्या आईवडिलांची झोप उडाली. त्यांनी तिचा शोध घेतला. त्यांनी बादलला विचारण्यासाठी दार ठोठावले. त्यावेळी ती बादलच्या घरात त्याच्या बेडवर झोपलेली दिसली. आईवडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून बादलला अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT