Special article on electrical vehicles sakal
नागपूर

इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’

वाढत्या इंधन दरामुळे नागरिकांची मिळतेय पसंती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता नागरिक विद्युत वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यंदा नागपूर शहरात ६७२ नवीन विद्युत वाहने दाखल झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत या वाहनांच्या संख्येत तिप्पटीने वाढ झालेली आहे. आगामी काळात यात वाढ होईल, असे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे त्याला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीने शंभरीपार केलेली आहे. सातत्याने होणारी दरवाढ यामुळे अनेक वाहनचालक आता विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत हे बचतकारक आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर रांग लावणेही यामुळे टाळता येते असे विद्युत वाहनधारक सांगत आहेत. गेल्या वर्षांपासून नागपूर शहर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विद्युत वाहन नोंदणीची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. सन २०२०-२१ मध्ये १८६ विद्युत वाहनांची नोंद करण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ६७२ इतक्या वाहनांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीन पटीहून अधिक वाहने नोंदणी झालेली आहे. या वाहनांमध्ये ४३४ दुचाकी, ८९ चारचाकी, सहा ई-रिक्षा प्रवासी १४९ तीनचाकी वाहने तर अशा एकूण ६७२ वाहनांची नोंद झाली आहे. दैनंदिन व जवळपासच्या प्रवासासाठीही विद्युत वाहने उपयुक्त ठरत आहेत.

इंधनापेक्षा चार्जिंगचा खर्च कमी

इंधनाच्या खर्चापेक्षा चार्जिंग करण्यास लागणाऱ्या विजेचा खर्च कमी आहे. एकदा तीन ते चार तास वाहन चार्जिंग केले की ते वाहन साधारणपणे ९० ते १०० किलोमीटरपर्यंत चालते. त्यामुळे पैशाची चांगली बचत होऊ लागली आहे, असे विद्युत दुचाकी चालक अविनाश गांजरे यांनी सांगितले.

''पारंपरिक इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. आगामी काळात यात वाढ होणार असून पुढील युग हे विद्यूत वाहनाचे असेल.''

-श्रीनिवास वरंभे, संचालक, एक्सेल मोटर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT