Hansdas Shendare
Hansdas Shendare Sakal
नागपूर

शर्टवर शब्द अन्‌ शब्दांतून जनजागृती

केतन पळसकर

नागपूर - मोसम बदला, युग बदला.. भला करे ना कोई! कोई किसी की सुनते नही.. न्याय न जगमे होय!!

या दोह्यांना पुटपुटत पंचाहत्तरीतील एक ज्येष्ठ नागरिक एकात्मता नगरमध्ये जनजागृती करताना दिसतो. त्यांच्या या दोह्यांतून आणि वाणीतून भ्रष्ट व्यवस्थेविरोधात त्यांचा असलेला रोष स्पष्ट जाणवतो. आजोबा तुम्ही इतके नाराज का? असे विचारल्यावर आजोबा समाजातील समस्यांचा पाढाच वाचतात. ‘मी कुनाले भेत नाही, या व्यवस्थेचा मी गेल्या बावीस वर्षांपासून असाच निषेध करत आहो, आन् करत राइन’, असे ते ठामपणे सांगतात. हंसदास शेंदरे असे त्यांचे नाव असून, आपल्या शर्टवर प्रशासनाचा विरोध करणाऱ्या ओळी लिहीत सायकलवरून त्यांचा प्रचार सुरू असतो.

केवळ प्रशासनावर आसूड ओढून शेंदरे आजोबा थांबत नाहीत तर एकात्मतानगरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. या परिसरात अवैधपणे दारूची विक्री होत होती. त्याविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. कुणीही त्यांना कपडे भेट दिल्यास ते याच पद्धतीने त्यावर ओळी लिहून भ्रष्टाचाराविरोधात लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

लहानपणापासून मला संगीत विषयाची आवड आहे. एकदा रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपून मी येत असताना पोलिसांनी मला हटकले आणि माझ्या हार्मोनिअमवर दांडू मारला. यामुळे माझा हार्मोनियम तुटला. या घटनेमुळे मी खूप व्यथित झालो. पोलिस अधिकाऱ्यांकडे या घटनेची तक्रार करूनही मला त्यांनी नवा हार्मोनियम दिला नाही. आलेल्या या अनुभवातून मी पोलिस आणि प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर आवाज उठवायचा ठरविले.

- हंसदास शेंदरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT