wasim chirya 
नागपूर

नागपुरचा हा कुख्यात गुंड अखेर जेरबंद, गोळीबारासह 23 गुन्हे आहेत दाखल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बंगाली पंजा भागातील गोळीबार कांडातील कुख्यात वसीम चिऱ्याला सात साथीदारांसह गजाआड करण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारावरून तहसील पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून पिस्तूल, दोन काडतूस व अन्य शस्त्र हस्तगत करण्यात आले आहेत.
वसिम ऊर्फ चिऱ्या शेख अफजल (35) रा. शांतीनगर घाटाजवळ, अरबाज ऊर्फ सानू इसराईल मांझा (24) रा. मोमीनपुरा, मोहम्मद फैजल अंसारी (27) रा. कामगारनगर, मोहसीन अहमद (30) रा. जाफरनगर, मोहम्मद अमीर (20) रा. मोमीनपुरा, सर्फराज अब्दूल सत्तार अंसारी (23) रा. मोमीनपुरा, हसन अली (21) रा. मोमीनपुरा हैदरी रोड आणि मुज्जू ऊर्फ मोहम्मद यासीन अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वसीम चिऱ्या कुख्यात गुन्हेगार असून तो गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्‍या आहे. त्याच्याविरुद्ध शांतीनगर, लकडगंज व अन्य पोलिसठाण्यांमध्ये गंभीरस्वरूपाचे 23 गुन्हे दाखल आहेत. बंगाली पंजा येथील पिली कार्पोरेशन शाळेजवळ राहणाऱ्या गुलाम रसूल जमाल पोटीयावाला (47) याच्या पुतण्याचे मोहसीन नावाच्या तरुणाशी जुने वैमनस्य होते. या वैमनस्यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे मोहसीनने ही माहिती त्याचा भाऊ शेख दानिश यास दिली.

शेख दानिशने आपले साथीदार गोळा केले. 15 मार्चला रात्री 10 च्या सुमारास आरोपी वसीम चिरा आपल्या साथीदारांसह गुलाम रसूलच्या घरी पोहचला. "आज तो तेरा गेम करना है' असा इशारा देताच गुलाम रसूल यांनी पळ काढला. आरोपींनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाचाही निशाणा न लागल्यामुळे त्याचा जीव वाचला.

त्याचप्रमाणे गुलाम रसूलच्या दोन दुचाकी आणि नॅनो कारची तसेच जवळ उभ्या असणाऱ्या 15 कार व दुचाकींची तोडफोड करीत इरफानभाई याच्या भोलाशहा पानठेल्याची देखील तोडफोड करून नुकसान केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. तेव्हापासून आरोपीही फरार झाले होते. तहसील पोलिस त्यांचा मागावर होते. विश्‍वसनीय माहिती मिळताच पोलिसांनी धडक देऊन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

Virar Municipal Election : बहुजन विकास आघाडीतून सत्तेसाठी आलेल्याना तिकीट देऊ नका; भाजपाच्या जेष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा

Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

MPSC Exam Update: MPSC कडून उत्तरपत्रिकेची नवी रचना जाहीर; जाणून घ्या काय बदलले आहे

SCROLL FOR NEXT