नागपूर : विद्युत खांब, उंच इमारती, झाडांचा आधार घेत पसरलेले केबलच्या जाळ्यामुळे रस्त्यावरून वर बघितल्यास शहराच्या आकाशावर आडवे-तिडव्या काळ्या तारा दिसून येतात. मात्र स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात भूमिगत केबलचे जाळे पसरविण्यात आले असून यापुढे नागरिकांच्या घरापर्यंत त्यातूनच विविध वाहिन्यांच्या मनोरंजनाचा खजिना पोहोचणार आहे. केबल ऑपरेटर्सना यासाठी शुल्क द्यावे लागणार असून ते ठरविण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असतानाच केबलच्या जाळ्यामुळे संत्रानगरी विद्रूप होत आहे. केबलच्या जाळ्यामुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) पुढाकार घेतला आहे.
शहरात सेफ ॲन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कोट्यवधी खर्च करून ऑप्टिकल केबलचे जाळे टाकण्यात आले आहे. आता हे केबलचे नेटवर्क शहरातील केबल एजन्सीना व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीला लिजवर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
भूमिगत केबल नेटवर्कचा उपयोग केल्याने ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण दूर झाल्याने शहर सुंदर दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत एनएसएससीडीसीएलचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी नुकताच शहरातील प्रमुख केबल ऑपरेटर्ससोबत बैठक घेतली.
या बैठकीत महाव्यवस्थापक (ई-गव्हर्नन्स) शील घुले उपस्थित होते. केबलमुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. वादळ व पाऊस यामुळे कधीही केबल तुटून अपघाताची टांगती तलवार नागपूरकरांवर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सर्वत्र भूमिगत केबल आच्छादण्यात आले आहेत. या अंतर्गत शहरात एकूण ७०० जंक्शन बॉक्सेस तयार करण्यात आले आहेत.
ज्या जंक्शन बॉक्समधून केबल ऑपरेटर लोकांच्या घरापर्यंत भूमिगत केबल टाकून उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना देऊ शकणार आहे. एनएसएससीडीसीएलचे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारीत शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा प्रस्ताव एनएसएससीडीसीएलच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत येणार आहे.
फायबर केबल नेटवर्कचे वर्गीकरण झोन तसेच वॉर्ड स्तरावर करण्यात आले आहे. मोरोणे यांनी लीज शुल्क निर्धारित करण्यासाठी शील घुले यांच्या नेतृत्वात एक समिती गठित केली असून पुढील आठवड्यात स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्धारित शुल्कावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत शहरात सर्वत्र भूमिगत केबल आच्छादण्यात आले आहेत. या अंतर्गत शहरात एकूण ७०० जंक्शन बॉक्सेस तयार करण्यात आले आहेत. एनएसएससीडीसीएलचे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारीत शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा प्रस्ताव एनएसएससीडीसीएलच्या आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत येणार आहे.
महेश मोरोणे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी कंपनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.