Nagpur News Esakal
नागपूर

Illegal Sand Mining: वाळू तस्करांना पोलिसांचा दणका! उमरेडला एक तर तळोधीती तीन टिप्परवर कारवाई

Nagpur News: पाचगाव आणि उमरेड येथील वाळू तस्कर व्हॉट्सअपवर वाहन मालकांचे वेगवेगळे ग्रुप चालवितात. त्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या नावावर ''एन्ट्री'' वसुलीचे काम केले जाते.

आशुतोष मसगौंडे

उमरेड-भिसी मार्गावर विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करणारे तीन टिप्पर ताब्यात घेत पोलिसांनी वाळू तस्करांना चांगलाच दणका दिला. दोन टिप्पर रिकामे मिळून आल्याने नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

दरम्यान भिवापूर पोलिसांच्या भीतीने भिसीवरून तळोधीकडे (जि. चंद्रपूर) गेलेले तीन टिप्पर तळोधी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसांपासून उमरेड-भिसी मार्गाने उखळी फाट्यावरून वाळूची तस्करी जोरात सुरू आहे. या मार्गांवर उमरेड, पाचगाव आणि सुरगाव येथील वाळू तस्करांचा चांगलाच बोलबाला आहे.

वैनगंगेच्या पात्रातील चोरलेली वाळू कान्पा, भिसी, उमरेडवरून उखळी मार्गे शहरात नेऊन विकली जाते. मध्यंतरी पोलिस निवडणूक कामात व्यस्त असल्याने वाळू तस्करांची मजा होती. निवडणूक आटोपताच पोलिस अधिकाऱ्यांनी पुन्हा त्यांचा मोर्चा वाळू चोरांकडे वळविला आहे. सोमवारी उमरेड-भिसी मार्गावर कारवाई करीत वाळूचे तीन टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोन टिप्पर मालकांनी आधीच वाळूची विल्हेवाट लावली होती. त्यामुळे ते दोन टिप्पर नंतर सोडण्यात आले.

येथील ठाणेदार जयप्रकाश निर्मल व उपनिरीक्षक संदीप सडमेक यांनी पहाटेच उखळी फाट्यावर ठिय्या मांडला. तस्करांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी भिसी हद्दीत वाहने थांबवून ठेवली होती. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी उखळी फाटा परिसर सोडला. पोलिस गेल्याचे समजताच वाळूची वाहने उमरेडच्या दिशेने रवाना झाली. मात्र मालेवाडा शिवारात या वाहनांना पोलिसांनी गाठले.

व्हॉट्सअप ग्रुपवर चालतो खेळ

पाचगाव आणि उमरेड येथील वाळू तस्कर व्हॉट्सअपवर वाहन मालकांचे वेगवेगळे ग्रुप चालवितात. त्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या नावावर ''एन्ट्री'' वसुलीचे काम केले जाते. अधिकाऱ्यांना टीप देऊन वाहने पकडून देण्याचे कामही त्यांच्याकडून केले जात असल्याची माहिती आहे.

तळोधी पोलिसांकडून टिप्पर जप्त उखळी फाट्यावर भिवापूर पोलिसांनी पहाटेपासून नाकाबंदी केल्याने वाळू भरलेली जवळपास पन्नास वाहने भिसी हद्दीत थांबून होती. त्यापैकी उमरेड व पाचगाव येथील तस्करांनी पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांचे टिप्पर तळोधीकडे ( जि.चंद्रपूर ) वळविलेत.

त्यापैकी तीन टिप्पर गस्तीवरील तळोधी पोलिसांच्या पथकाने जप्त केलीत. त्यातील एक टिप्पर जुनघरे तर दोन टिप्पर वैद्य याच्या मालकीचे असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT