open food Sakal
नागपूर

पावसाळा तोंडावर, दूषित पाण्यापासून सावधान!

उघड्यावरचे पदार्थ टाळा, आरोग्य सांभाळा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पावसाळा म्हणजे सृजनाचा काळ. तप्त उन्हाळा अंगावर काढल्यानंतर धरणीही तुषांराची प्रतीक्षा करीत असते. मृग लागताच पावसाळ्याला खरी सुरूवात होते. वृक्षही कात टाकतात. वातावरणात गारवा पसरतो. नद्या-नाले तुडूंब भरून वाहतात. असा हा पावसाळा क्षुधा शमन करणारा असला तरी सोबत रोगराई घेऊनही येतो. रोगराई पसरविण्यात उघड्या खाद्यपदार्थांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आरोग्य सांभाळण्यासाठी उघड्यावरील अन्न आणि खाद्यपदार्थ टाळण्याची गरज आहे.

पावसाळ्यातील आजारांच्या दृष्टीने महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात काळजी घेण्याची गरज व्यक्त करीत महापालिकेने दूषित पाणी पिणे तसेच उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन केले. पावसाळ्यात अनेकदा पिण्याचे पाणीही दूषित होते. ते पाणी घेतल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे उलट्या, जुलाब, कावीळ होण्याची शक्यता आहे. किंबहुना पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढते, त्यामुळे म्हणून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी व्यक्त केली. उलट्या, जुलाब, काविळ, गॅस्ट्रो, टायफॉईड झाल्यास त्वरित उपचार सुरू करावेत.

ताप, मळमळ, चक्कर, वांती, जुलाब इत्यादी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरित ओआरएस पाजावे व त्वरित डॉक्टरांकडे नेऊन उपचार करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी सर्दी, ताप, फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दुखणे अंगावर काढू नये, स्वाईन फ्ल्यू किंवा एनफ्लुएन्झासाठी खात्रीशीर औषधोपचार उपलब्ध आहेत. नागरिकांनी सूचनांचे पालन करून आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करावी, असे आवाहन मनपाचे डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले.

खासगी रुग्णालयांनी रुग्णाची माहिती द्यावी

अनेक नागरिक उपचारासाठी खासगी डॉक्टरकडे जातात. खासगी डॉक्टरांनी रुग्णासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्वरित माहिती द्यावी, अशी सूचना डॉ. नरेद्र बहिरवार यांनी केली आहे. मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात गॅस्ट्रो रुग्णांवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हे टाळा : बोअरवेल, विहिरीचे पाणी, उघड्यावरील पदार्थ

हे करा : पाणी उकळून घ्या, पाण्यात क्लोरिन गोळ्याचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

INDW vs BANW: राधा यादवसह भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशविरुद्ध तिखट मारा, वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी सोप्या विजयाची संधी

Noida International Airport : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख लवकरच ठरणार! मोदी करणार उद्घाटन?

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात धान्य खरेदीसाठी १.५४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी! हा आहे टोल फ्री क्रमांक

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

SCROLL FOR NEXT