Income of five lakhs per annum from two and a half acres Nagpur Farmer news 
नागपूर

अडीच एकरातून वर्षाला पाच लाखांचे उत्पन्न; नियोजन व परिश्रमातून फुलविली शेवग्याची शेती

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांना फाटा देत हिंगणा तालुक्यातील मेणखात शिवारामध्ये रविशेखर गिल्लूरकर या प्रयोगशील शेतकऱ्याने नियोजन व परिश्रमातून शेवग्याची शेती फुलविली आहे. नियोजनबद्ध शेती केल्यास कुठल्याही पिकातून चांगले उत्पादन घेता येते, असा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. सोबतच हिंगणा तालुक्यात शेवगा पीक चांगल्या प्रकारे घेतले जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अडीच एकरातील शेतीमध्ये गिल्लूरकर यांनी केलेल्या नियोजन आणि परिश्रमाला आता उन्नतीचे फळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

५९ वर्षीय रविशेखर गिल्लूरकर यांनी मेणखात शिवारामध्ये असलेल्या शेतीमध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत अडीच एकर शेतीमध्ये तांत्रिक मार्गदर्शन आणि योग्य नियोजन करून शेवग्याची मागच्या वर्षीच्या जून महिन्यामध्ये सहा बाय दहा फूट अंतरावर लागवड केली. सोबतच आंतरपीक म्हणून पपईची निवड केली. शेवग्याचे दोन फुटावर झाड झाल्यावर शेंडा खुडल्यानंतर आठ महिन्यानंतर झाडांची सध्या चांगली वाढ झाली आहे.

पीक काढणीला आल्यानंतर लॉकडाउन आणि कोरोनाच्या प्रादूर्भावातही गुमगाव परिसरातच शेंगा सध्या ८० रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. अडीच एकरात लावलेल्या याच शेवग्याच्या शेंगांतून पुढले दहा वर्षे त्यांना वार्षिक चार ते पाच लाखांचा निव्वळ नफा होण्याचा अंदाज आहे. पीक नियोजन, पाण्याची काटकसर, बाजारपेठेचे ज्ञान या गोष्टी आत्मसात करून गिल्लूरकर यांनी पिकाची निवड केली. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लाखमोलाची शेती

बियाणे खरेदी, लागवड खर्च, ड्रीप व इतर खर्च यावर गिल्लूरकर यांना ८० ते ९० हजार खर्च आला. इतर पिकांच्या तुलनेत शेवगा हे पीक कमी खर्चाचे व कमी मेहनतीचे असल्याचे गिल्लूरकर यांना प्रत्ययास येत असून मित्र प्रशांत शोभने यांची वेळोवेळी साथ मिळत असल्याने शेवग्याची शेती लाखमोलाची ठरणार असल्याचे रविशेखर सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT