It is not government job to find evidence for caste Petition against Committee of OBC Mukti Morcha marathi news esakal
नागपूर

Nagpur News : जातीसाठी पुरावे शोधणे शासनाचे काम नाही; ओबीसी मुक्ती मोर्चाची समिती विरोधात याचिका

मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी समाज असून त्यासाठीचे पुरावे शोधण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी समाज असून त्यासाठीचे पुरावे शोधण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. मात्र, एखाद्याची जात सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधणे हे सरकारचे काम नाही.

त्यामुळे, ७ सप्टेंबरला शासन निर्णय जारी करीत नेमलेली समिती असंवैधानिक असल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावे शोधण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली असून त्यासाठी शासन आदेशही काढण्यात आला आहे.

या याचिकेच्या माध्यमातून या शासन आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक नितीन चौधरी यांनी त्यांचे वकील भुपेश पाटील यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यावर बुधवारी (ता. ४) सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेनुसार, १०५ व्या घटना दुरुस्तीनुसार कोणत्या जातीला आरक्षण द्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभेला आहे.

राज्याला केवळ यादी तयार करण्याचे अधिकार आहेत. या अधिकारात राज्याला केवळ एखाद्या जातीला ओबीसी वर्गाच्या यादीत टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ७ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशानुसार, एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाज हा पूर्वीचा कुणबी समाजच असल्याचे निजाम काळातील पुरावे शोधण्याचे काम या समितीला देण्यात आले आहे.

पण, एखाद्याची जात सिद्ध करणे हे राज्य सरकारचे काम नाही. नियमानुसार, एखाद्याला आपली जात सिद्ध करायची असल्यास त्याला स्वत:लाच ते जात पडताळणीपुढे सिद्ध करावे लागते. त्यामुळे, ज्याला त्याला आपली जात सिद्ध करावी लागते, हा नियम आहे. परंतु या शासन आदेशानुसार राज्य सरकार जात सिद्ध करण्याचे काम करीत आहे.

हे असंवैधानिक असून तसे झाल्यास जात पडताळणी समितीच्या अधिकारांवर गदा येईल. त्यामुळे, हा शासन आदेश असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करीत तो रद्दबातल ठरवावा, अशी विनंती या याचिकेमार्फत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT