Jayant Patil said prepare for self-reliance in the Municipal Corporation Nagpur political news 
नागपूर

जयंत पाटील म्हणाले, राजकारणात ताकद महत्त्वाची असते; तरच दखल घेतली जाते

राजेश चरपे

नागपूर : राजकारणात ताकद महत्त्वाची असते. तरच दखल घेतली जातो. असा मंत्र देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक वॉर्डातील बूथ बांधण्याची सूचना केली. महापालिकेच्या निवडणुकीत याला, त्याला जागा मागण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद कार्यक्रमात पाटील यांनी सोमवारी शहरातील तीन आणि ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश युवा अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवी वरपे, प्रदेश युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण कुंटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर, शहर महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, ग्रामीण महिला अध्यक्ष अर्चना हरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

शहरात राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. हाच धागा पकडून पाटील यांनी आगामी महापालिकेची निवडणूक लढायची असेल आणि आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या वाढवायची असेल तर प्रत्येक बुथवर ताकद निर्माण करावी लागेल असे सांगितले. अन्यथा किती जागा लढल्या, काँग्रेसला कितीही जागा वाढवून मागितल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागला. ताकद दाखवा.

राज्यात आपली सत्ता आहे. त्याचा पुरेपूर लाभ घ्या. काँग्रेस किती जागा सोडेल नाही सोडेल हा सध्या प्रश्न नाही. ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी बघू. मात्र तत्पूर्वी आपला पक्ष ताकदवान करा. प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असेही जयंत पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Liver, Kidney, Gut Detox: फक्त १४ दिवसांत करा सगळं शरीर स्वच्छ! आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT