stress
stress sakal
नागपूर

Nagpur News : रेसने वाढवला आयुष्यात स्ट्रेस; जीवनशैली जबाबदार

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : नोकरीतील ताणतणाव, करिअर घडवण्यासाठी आयुष्यात लागलेली ‘रेस’ हेच मनुष्याच्या ‘स्ट्रेस’चे कारण बनले आहे. यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, क्षयरोगापासून तर दमा, कॅन्सरसारख्या व्याधींच्या विळख्यात मनुष्य अडकला. या आजारांवर औषध असले, तरी ‘स्ट्रेस’मुळे मानसिक आरोग्याच्या खाईत मनुष्य लोटला जात आहे.

व्यायामाचा अभाव, बैठे काम, अयोग्य आहार, मोबाईलमुळे अर्धवट झोप, यामुळे पंचविशीतच आजारांचा विळखा बसत आहे. त्यातच डॉक्‍टरांकडून प्रतिजैविकांचा ‘ओव्हरडोस'' दिला जात अलल्याने किडनीपासून तर कॅन्सरपर्यंतचा धोका वाढला.

नागपूर जिल्ह्यात १० हजार क्षयरोगी आहेत. साडेचार लाखांवर मधुमेही आहेत. डेंगी, मलेरियासारख्या आजारांचा सामना वर्षभर नागपूरकर करीत आहेत. यामुळे ‘औषधोपचारांपेक्षा खबरदारी बरी’ असे वैद्यक तज्ज्ञ सांगत आहेत. प्रतिजैविकांच्या वापरावर वेळीच पावले न उचलल्यास धोका वाढेल, असे डॉ. प्रवीण शिंगाडे म्हणाले.

नारपूरकरांच्या आरोग्याचे वास्तव

  • क्षयरोग : जिल्ह्यात २०२२ मध्ये १० हजार ७७० रुग्ण आढळले, ४५८ मृत्यू झाले

  • कर्करोग : जिल्ह्यात दरवर्षी ३ हजारावर नवीन कॅन्सरग्रस्तांची नोंद होते.

  • मधुमेह : जिल्ह्यात साडेचार लाख मधुमेही आहेत

१० टक्के मुले नैराश्यात...

नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील १४ हजारावर मुलांचा मानसिक अभ्यास केला असता १० ते १९ वर्ष वयोगटातील १० टक्के मुलांमध्ये नैराश्य आढळल्याचे निरीक्षण ॲडोलसेंट हेल्थ अकादमीच्या माजी अध्यक्ष डॉ. मंजुषा गिरी यांनी नोंदविले. पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन काय चांगले?, काय वाईट? हे समजावून सांगण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी व्यक्त केली.

साडेतीन वर्षांत एक हजार कोटी खर्च

राज्यात १ जानेवारी २०१९ ते ३० जुलै २०२२ या सुमारे साडेतीन वर्षांत कीटकजन्य आजाराने २.१८ लाखांवर लोकांना विळख्यात घेतले. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने ९८९ कोटी खर्च करूनही १५८ जणांचा बळी गेले. या काळात मलेरियाच्या ४८,४९९ रुग्णांची नोंद झाली. ३५ जणांचा मृत्यू झाला. डेंगीच्या ३२ हजार ७७८ रुग्णांची नोंद झाली. १०१ रुग्ण दगावले. चिकनगुनिया आजार ५,४५८ जणांना झाला. फायलेरियाचे १ लाख ३१ हजार ५०९ रुग्ण आढळले.

वर्षनिहाय खर्च

  • वर्ष - कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी खर्च (रुपयांत)

  • २०१९ -२० - २९० कोटी २४ लाख ५८ हजार ७४०

  • २०२० -२१ - २६५ कोटी ७ लाख ९६ हजार २३४

  • २०२१ -२२ - ३०२ कोटी ५३ लाख २६ हजार ७६०

  • २०२२-२३ - (जुलै २२ पर्यंत) - १३१ कोटी ९६ लाख ६८ हजार ९३२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT