murder
murder sakal
नागपूर

नागपूर : पैशाच्या वादातून सुपरवायझरचा खून ; आरोपीला अटक

मंगेश गोमासे

नागपूर : मजूरीचे पैसे न दिल्याच्या कारणाहून कामावरील मजूराने सुपरवायझरचा धारदार शस्त्राने वार करीत खून केल्याची घटना बुधवारी (ता१७) रात्री दहा वाजताच्या सुमारास बेलतरोडी येथील शंकरपूर मेट्रोसिटी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बालाघाट येथून अटक केली आहे. विनोद मडावी असे आरोपीचे नाव असून मनोजकुमार सुखचंद पाटील (वय २७, रा. लालबर्रा, बालाघाट) असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलतरोडी येथील शंकरपूर मेट्रोसिटी येथे असलेल्या ले-आऊटवरील प्लॉटवर घराचे बांधकाम सुरू आहे. त्याचे कंत्राट आषय प्रमोद मांडवकर (वय २३, रा. न्यु मनिष नगर) यांच्याकडे आहे. त्यांनी त्यासाठी मनोज सुखचंद पाटील (सध्या रा.भगवान नगर रोड, न्यु ज्ञानेश्‍वरनगर) याची सुपरवायझर म्हणून नेमणूक केली. तो कामाकडे लक्ष ठेवून दर आठवड्याला त्यांची मजूरी द्यायचा.

कामाचा बाजुलाच विनोद मडावी आणि त्याची वहिणी राहायचे. ते दोघेही मांडवकर यांच्याकडे कामाला होते. गेल्या काही दिवसांपासून विनोद मडावी याने केलेल्या कामाचे ४ हजार रुपये मनोज याने दिले नव्हते. त्याचा राग त्याच्या मनात होता. त्यामुळे तो वारंवार त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होता. बुधवारी रात्री तो विनोदकडे गेला. त्यानंतर दोघेही दारू प्यायले.

दरम्यान दोघेही कामाच्या परिसरात आले. यावेळी विनोदने त्याला पैशाची मागणी केली. त्यामुळे मनोजने त्याला शिविगाळ केली. त्यातून राग अनावर झाल्याने त्याने तिथेच असलेला हाथोडा मनोजच्या डोक्यात हानला. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होत, मनोज रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान विनोद तिथून आपल्या वहिनीसह पसार झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. यावेळी आरोपीचे लोकेशन ट्रेस करीत, त्याला बालाघाट येथून अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT