Larvae in the food of the people isolated 
नागपूर

विलगीकरणातील नागरिकांच्या जेवणात अळ्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः वेळेवर जेवण मिळत नसल्याने संतप्त झालेल्या व्हीएनआयटी येथील विलगीकरणातील नागरिकांना आज जेवणातील डाळीत चक्क अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जेवणाला हातही लावला नसून पोळ्या जाड्या असल्याने चावताना कसरत करावी लागल्याचे येथील काही नागरिकांनी नमूद केले. 

व्हीएनआयटी येथे जवळपास चारशे नागरिक विलगीकरणासाठी आहेत. नुकताच येथील नागरिकांनी वेळेवर जेवण, नाश्‍ता मिळत नसल्यावरून येथील जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आज येथील नागरिकांना रात्रीचे जेवण देण्यात आले. जेवणाची थाळी उघडताच अनेकांनी जेवण्यास सुरुवात केली. मात्र, काही नागरिकांना जेवताना वरणात अळ्या आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांनी लगेच जेवण नाकारले.

रात्री दहा वाजेपर्यंत नागरिकांनी जेवणाला हातही लावला नाही. याशिवाय जेवणात पोळ्यांची जाडी अधिक असल्याने वृद्ध व चिमुकल्याने चावताना त्रास होत असल्याचे एका नागरिकाने नमूद केले. त्यामुळे येथे उपचारासाठी आणले की उपाशी मारायला? असा संतप्त प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला. येथे प्राथमिक सोयीसुविधाच नसल्याचे मागील मंगळवारी संतप्त नागरिकांच्या व्हायरल व्हिडिओमुळे पुढे आले. येथे आलेल्या नागरिकांनीच येथील असुविधांचे पितळ उघडे पाडले.

येथे केवळ दोनच प्रसाधनगृहे असून अनेकांना नैसर्गिक प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी काहींची तब्येत बिघडल्याचे येथील काही नागरिकांनी आप्तांना फोनवरून सांगितले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून एका महिलेने कुठल्याच सुविधा नसल्याचे स्पष्ट केले. आज सकाळीही वेळेवर जेवण मिळाले नसल्याचे एका महिलेने सांगितले. विलगीकरणातील गैरसोयीबाबत कुणाकडे तक्रार करावी, येथे कुणीही अधिकारी नाही, अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT