Ventolator
Ventolator 
नागपूर

कोरोनाशी लढायचे आहे, पण व्हेंटिलेटरची संख्या आहे तोकडी... 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्पात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. या टप्प्यावर कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मृत्यू होत आहेत. अशावेळी बाधिताला श्‍वसनाचा त्रास होण्याची दाट शक्‍यता आहे. व्हेंटिलेटरची गरज पडण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र, उपराजधानीत मेयो आणि मेडिकलमध्ये अवघे 12 व्हेंटिलेटर आहेत. 

कोरोनाशी लढताना व्हेंटिलेटर कमी पडू देणार नाही, अशी शासन-प्रशासनाची घोषणा महिन्याभरानंतरही केवळ घोषणाच राहिली आहे. मेयो रुग्णालयात 4 तर मेडिकलमध्ये 8 अशा डझनभर व्हेंटिलेटरच्या भरवशावर कोरोनाविरोधाचा किल्ला लढवण्याचे मेडिकल-मेयोचे प्रयत्न सुरू आहेत. शहराची लोकसंख्या 30 लाखांवर आहे. त्या तुलनेत खाटांची संख्या अल्प आहे. मेडिकल, सुपर, मेयो आणि डागा अशा चार शासकीय रुग्णालयांची खाटांची संख्या अडीच हजारांवर आहे.

मेयोत चार तर मेडिकलमध्ये केवळ आठची सोय 
या खाटांच्या तुलनेत 10 टक्के व्हेंटिलेटरची गरज शासकीय रुग्णालयात आहेत. मेडिकलमध्ये 200 व्हेंटिलेटरची गरज आहे. मात्र, मेडिकलमध्ये सध्या 85 व्हेंटिलेटर आहेत. शासनाने व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली; मात्र अद्याप एकही व्हेंटिलेटर ना मेयोत पोहोचले ना मेडिकलमध्ये. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर व्हेंटिलेटर पोहोचतील काय, असा सवाल केला जात आहे. 

डागा, आयुर्वेद, कामगार रुग्णालय व्हेंटिलेटरशिवाय 
शहरात मेयो, मेडिकल वगळता डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय असो की राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय, ही सर्व रुग्णालये व्हेंटिलेटरशिवाय आहेत. या तिन्ही रुग्णालयांत 1100 खाटा आहेत. मात्र, एकही व्हेंटिलेटर नसल्यामुळे येथे गंभीर रुग्णाला उपचारासाठी दाखल करता येत नाही. 40 खाटांचे आयसोलेशन रुग्णालयदेखील व्हेंटिलेटरशिवाय आहे. विशेष असे की, आयसोलेशन रुग्णालय साथीच्या आजारावर एकमेव रुग्णालय आहे. यामुळे मेयो आणि मेडिकल या टर्शरी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. पुढच्या टप्प्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची जोखीम लक्षात घेता व्हेंटिलेटर यंत्रणा वाढविण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT