lockdown effect on sweet gathi in holi festival in nagpur
lockdown effect on sweet gathi in holi festival in nagpur 
नागपूर

कोरोनाने गाठी व्यावसायिकांचे मोडले कंबरडे; एकूण दोन कोटींचा तोटा, तर यंदा गाठीचे दर वाढण्याची शक्यता

केतन पळसकर

नागपूर : सलग दोन वर्षे होळी सणाच्या दरम्यान लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने गाठी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन्ही वर्षी भांडवल म्हणून लावलेले पैसे निघू न शकल्याने प्रत्येक व्यावसायिक तोटा सहन करतो आहे. तसेच या व्यवसायावर पोट असलेले मजूरही बेरोजगार झाले आहेत. 

गाठ्या तयार करण्यासाठी शहरातील विविध भागामध्ये वसलेले अनेक कारखाने दरवर्षी दोन महिन्यापूर्वी पासूनच तयारीला लागतात. मागच्यावर्षीच्या धक्क्यातून सावरत यावर्षी सर्व व्यावसायिकांनी जोमाने सुरुवात करीत गाठींची निर्मिती केली. मात्र, पुन्हा एकदा लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने यापूर्वी १ हजार किलोचा माल विकत घेणारा किरकोळ व्यापारी यंदा फक्त ५० किलोंचा माल विकत घेतो आहे. तसेच, लहान-लहान गावातून येणारे किरकोळ व्यापारी यंदा माल घेऊ शकले नाही. तोटा सहन न झाल्याने शहरातील कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. यामुळे, यंदा गाठीचे दर वाढण्याची शक्यता आहे. 

गाठीचे दर - 
घाऊक बाजार : ६० ते ६२ रुपये किलो 
किरकोळ बाजार : ८० ते १०० रुपये किलो 

५० कारखाने -
तोटा : ४ लाख (प्रत्येकी दोन वर्ष) 
एकूण तोटा : २ कोटी 

एकूण खप -
पोती (दरवर्षी) : २ हजार ते २५०० 
लॉकडाउनमध्ये : ५०० पोती 
एकूण कारखाने - सुमारे ५० 
कामगारांची संख्या- सुमारे २५० 

दोन कोटींची उलाढाल ठप्प - 
दोन्ही वर्षी होळीच्या काळातच लॉकडाउन असल्याने तब्बल दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी व्यापाऱ्यांना आता आणखी एक वर्ष वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही. 

अनेकांनी गुंडाळले कारखाने -
कुठलाही व्यापार सुरू करण्यासाठी भांडवल उभे करणे सोपे नाही. ज्यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले त्यांच्यासमोर तर प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी कारखानेच बंद केले आहेत. 

आम्ही अनेक पिढ्यांपासून या व्यवसायात आहे. लॉकडाउनमुळे आम्हाला मागील वर्षी दोन लाखांचा फटका बसला. शहरामध्ये जवळपास ५० कारखाने असून प्रत्येक कारखान्यामध्ये ५ जण कामाला आहे. या सर्व २५० कामगारांवर संकट ओढवले आहे. 
-लक्ष्मीनारायण शाहू, गाठी कारखानदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT