lowest rainfall in june for second time in ten years agricultural farmer crop  Sakal
नागपूर

Nagpur Rain Update : दहा वर्षांत दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस; शेतीचे गणित बिघडणार

Weather Forecast For Agriculture : बळीराजा संकटात : शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान राहणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशातील हवामान विभागाने यंदा सरासरी इतका किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र वरुणराजाने निराशा केल्याने त्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत. दहा वर्षांत जूनमध्ये दुसऱ्यांदा जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उरलेल्या तीन महिन्यांकडे लक्ष लागले आहे.

चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात नागपूर जिल्ह्यात सरासरी १९०.६ मिलिमीटर पाऊस पडतो. या महिन्यात सर्वाधिक ५००.६ मिलिमीटर पावसाचा विक्रम १८८१ मध्ये नोंदविण्यात आला, तर २४ तासांत सर्वाधिक ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद १२ जून १९११ रोजी करण्यात आली होती.

मात्र यावेळी संपूर्ण जूनमध्ये आतापर्यंत केवळ १२६.९ मिलिमीटर पावसाचीच नोंद झाली आहे. गेल्या दशकातील जूनच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, जिल्ह्यात दुसऱ्यांदा इतका कमी पाऊस बरसला आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये फक्त ७२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. विविध हवामानतज्ज्ञ व संकेतस्थळांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही कमी विदर्भात अतिशय कमी पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. सुदैवाने जुलैच्या उत्तरार्धात व त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस पडून बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मागील दहा वर्षांमध्ये जूनमध्ये पडलेला पाऊस

वर्ष - एकूण पाऊस

  • २०१५ - १३५.७ मिमी

  • २०१६ - १७६.६ मिमी

  • २०१७ - २१६.४ मिमी

  • २०१८ - २९३.५ मिमी

  • २०१९ - ७२.६ मिमी

  • २०२० - २७७ मिमी

  • २०२१ - १९७.७ मिमी

  • २०२२ - १३५.७ मिमी

  • २०२३ - १५२.३ मिमी

  • २०२४ - १२६.९ मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eighth Pay Commission Update: आठवा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट! कर्मचाऱ्यांना लवकरच ‘Good News’ कारण...

IND vs NZ 2nd T20I : भारतीय संघाने मोडला पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २००+ धावांचा 'असा' पाठलाग करणारा जगातील पहिलाच संघ

Pune Election : रूपाली ठोंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime : पुणे पोलिसांची कठोर कारवाई: वानवडीतील गुन्हेगार महेश शिंदेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

Investment Fraud : दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून १५ कोटींची फसवणूक; पुण्यातील व्यापाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT