नागपूर

Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री 'या' दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

Dada Bhuse in Winter Session: शेतकऱ्यांच्या अडचणीची सरकारला पूर्ण जाणीव आहे. थोडा धीर धरा. मुख्यमंत्री शुक्रवारी मोठी मदत जाहीर करणार आहे. ती ऐकून तुम्हालाही आश्यर्याचा धक्का बसेल असा दावा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा घुसे यांनी केला.


विधानसभेत शेतकरी, गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळावरील अल्पकालीन चर्चेला त्यांनी उत्तर दिले. विरोधकांतर्फे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी रेटून धरली जात आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार यांनी सभागृहात दोनदा स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो फेटाळून लावण्यात आला. सोमवारी या विषयावर अल्पकालीन चर्चा घेण्यात आली. यास दादा भुसे यांनी मंगळवारी उत्तर दिले. ते म्हणाले, आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत देणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधावर जाऊन आले आहेत. तातडीने पंचनामे केले जात  आहेत.  मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी याबाबत घोषणा करणार आहेत. ती ऐकून तुम्हला आश्चर्य वाटेल. तुम्ही तोंडात बोटे घालाल, असे दादा भुसे यांनी सांगितले.

फक्त घोषणा नको मदत द्या
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तुम्ही पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नसल्याचे सांगून बोटात तोंडे घालून शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, असे सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT