gandhi  sakal
नागपूर

Mahatma Gandhi : गांधी विचारात पर्यावरणविषयक समस्यांचे समाधान

‘गांधीयन वेआऊट ऑन इन्‍व्‍हायरमेंटल इश्‍यूज’ यावरील संशोधनातून उघड

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व, सत्य-अहिंसेचे पुजारी, विचारक, तत्त्वचिंतक, सत्याग्रह, सर्वोदय या संकल्पना जनमाणसात रुजविणारे राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी हे आद्य पर्यावरणवादी होते. त्‍यांचे पर्यावरण विषयक आचार-विचार ग्‍लोबल वॉर्मिंग समस्‍यांच्‍या समाधानासाठी उपयुक्‍त ठरू शकतात, असा निष्‍कर्ष डॉ. अपरूप अडावदकर यांनी संशोधनातून मांडला आहे.

डॉ. अडावदकर हे पर्यावरण प्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. तसेच राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात अस्थायी प्राध्यापक आहेत. नागपूर विद्यापीठाने नुकतीच त्‍यांना ‘गांधीयन वेआऊट ऑन इन्‍व्‍हायरमेंटल इश्‍यूज’ या विषयावरील शोध निबंधासाठी पीएच.डी. प्रदान केली आहे. ‘पृथ्वी ही आपल्या सर्वांची हावसाठी नव्‍हे तर गरजा भागवण्‍यासाठी आहे’, असा मंत्र महात्‍मा गांधी यांनी सुमारे आठ दशकांपूर्वी दिला होता.

इंग्लंड, युरोप आदी देशांमध्‍ये जी झपाट्याने औद्योगिक क्रांती झाली. त्‍यामुळे ग्‍लोबल वॉर्मिंग सारख्‍या मोठ्या पर्यावरणीय समस्‍यांचा जगाला सामना करावा लागत आहे. ‘ही झालेली औद्योगिक क्रांती बघता आपल्‍याला तीन पृथ्‍वीदेखील कमीच पडेल’ असे उद्‍गार गांधीजींनी काढले होते. त्‍यांनी यावर उपाय म्‍हणून स्‍वत: कमी पाणी लागणाऱ्या खादीचा वापर सुरू केला. पाण्याचा व सर्वच नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकी उपभोगाला त्‍यांनी प्राधान्य दिले.

प्रत्येकाने शरीर श्रमाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेतला तर शोषण निश्चित कमी होईल आणि खऱ्या अर्थाने मानवाचा निसर्गाशी सुसंवाद साधला जाईल, असे त्‍यांनी तत्‍वज्ञान मांडले होते. साधेपणा, लहान गोष्टींना प्राधान्य आणि वेग कमी करणे म्हणजेच विकासाची त्रिसूत्री गांधीजींच्या शिकवणुकीत आपल्याला आढळते. नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री यांना गांधींचा आंधळा विरोध नव्हता तर मनुष्याला आळशी, गुलाम बनविणाऱ्या यांत्रिकीकरणाचा त्यांनी विरोध केला.

आज या सगळ्याचा सामाजिक परिणाम आपण पाहतोच आहे. मोठी धरणे, मोठे प्रदूषणकारी प्रकल्प आणि त्यामुळे विशिष्ट ठिकाणी होणारी लोकांची गर्दी आणि त्यातून वाढणारी गुन्हेगारी, अत्याचार व अशांतता हे संपवायचे असेल तर विकेंद्रित, ग्रामीण भागाचा विकास अत्यावश्यक आहे, हे डॉ. अडावदकर यांनी आपल्या प्रबंधात गांधी विचारांच्या संदर्भाने स्पष्ट केले आहे.

म. गांधींची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून दखल

शाश्वत वैश्विक विकासाची दिशा दाखवणारे एक पर्यावरण-तज्ज्ञ म्हणून गांधीजींची दखल सगळे जग आज घेत आहे, हे डॉ. अडावदकर यांनी त्‍यांच्‍या शोधनिबंधात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT