electricity sakal
नागपूर

Mahavitaran: ६ हजार ६९९ ग्राहकांची वीज कापली! महावितरणने उगारला बडगा; घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ४३ लाख थकबाकी

महावितरणकडची ग्राहकांची थकबाकी वाढतच चालली असून महावितरणने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ६९९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gadchiroli: महावितरणकडची ग्राहकांची थकबाकी वाढतच चालली असून महावितरणने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ६९९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आदींची थकबाकी ५२१ कोटी ९१ लाखांच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेत ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडून २२ कोटी ३९ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडून ६ कोटी १५ लाख येणे आहे, औद्योगिक ग्राहकांकडून ३ कोटी १९ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ३३ लाख येणे आहे तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून ५ कोटी ८५ लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून ३४७ कोटी व पथदिव्यांची थकबाकी १३१ कोटींच्या घरात पोहोचली आहे.

नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान चंद्रपूर परिमंडळातील १७ हजार ३९८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार ६९९, तर गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ६९९ ग्राहकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात घरगुती ग्राहकांकडून ६ कोटी ४३ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक ग्राहकांकडून ८१ लाख येणे आहे,

औद्योगिक ग्राहकांकडून १ कोटी ७ लाख थकबाकी, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ५७ लाख, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून ३ कोटी ६६ लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून ११० कोटी ५७ लाख व पथदिव्यांची थकबाकी १३१ कोटी ८ लाखांच्या घरात पोहोचली आहे. नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, थकबाकीत असलेली सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे व महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसूल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत असते. वीजबिल वसुलीतून प्राप्त पैशांमधून ८५ टक्के रक्कम वीजखरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता, कर्मचारी वर्गास मारहाण, अपमान सहन करण्याचे प्रसंग येतात. ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे अपेक्षित आहे.

रोख भरण्यावर मर्यादा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो. या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पद्धतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व यूपीआय आदी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीजबिल भरणा करता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT