Makar Sankranti 2023 Death of child kite Crushed railways due leg stuck Parents should take care of children nagpur
Makar Sankranti 2023 Death of child kite Crushed railways due leg stuck Parents should take care of children nagpur  sakal
नागपूर

Makar Sankranti 2023 : पतंगीच्‍या नादात मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंतग पकडण्याच्या नादात १३ वर्षीय मुलाला रेल्वे ट्रॅकवर रेल्वेचा धक्का लागल्याने चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार पाच वाजताच्या सुमारास धंतोली परिसरातील कुंभारपुरा रेल्वे ट्रकवर घडली.

यामुळे समाजमन सुन्न झाले असून पतंग उडवताना पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. संक्रांत सणाच्या आनंदात मुलांच्या सुरक्षेबाबत मुलांसह पालकांना अधिक सतर्क राहावे, असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

वंश प्रवीण धुर्वे (रा. कुंभारपुरा) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वंश याचे वडील सुरक्षारक्षक असून आई राजश्री रुग्णालयात मदतनीस आहेत. तीन वर्षांपूर्वी त्याची आई मुलासह कुही मांढळ येथून नागपूरला आली होती. गावात त्यांच्या दोन बहिणी आहेत. वंश हा भिडे हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकतो.

शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वंश हा परिसरातील मुलांसह कुंभार टोलीतील रेल्वे रुळाजवळ खेळत होता. त्याला कटलेली पंतग दिसली. ती पकडण्यासाठी तो धावला. रेल्वे रुळावर गेला. याचवेळी आलेल्या गाडीने त्याला धडक दिली. त्यामुळे रुळावर आल्याने कटून वंशचा मृत्यू झाला. ही माहिती त्याच्या मित्रांनी घरच्यांना दिली.

त्याची आई घरी होती. याबाबत कळताच तिने हंबरडा फोडला. धंतोली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी वंशचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वंशच्या मृत्यूने धुर्वे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

ट्रकमध्ये अडकला पाय

वंश अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात त्याला सर्व जण ओळखायचे. शुक्रवारी दुपारी तो मित्रांसोबत परिसरात खेळत होता. अचानक कटलेला पंतग दिसून आल्याने तो पकडण्यासाठी वंश धावला. धावत असताना, त्याचा पाय ट्रकमध्ये अडकला. तेव्हाच समोरून येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली अन् गाडीखाली येत कटून त्याचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक अन् कोठडी अवैध; सुप्रीम कोर्टाने दिले सुटकेचे आदेश

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Latest Marathi News Live Update : राजस्थान खाणीत १४ पैकी १० जणांना बाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT