नागपूर : नागपुरात अवघ्या सहा तासांत दोन खून (nagpur crime) झाल्याच्या घटना घडल्या असताना आता जिल्ह्यातून पुन्हा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील काटोल (katol) तालुक्यातील रिधोरा (ridhota village) गावात राहणारा टॅक्सी चालक अंगद कडुकर याची निर्घृण हत्या (murder) झाली आहे. पहिल्यांदा गळा आवळला. त्यानंतर त्याला झाडा-झुडपात फेकून दिले. मात्र, तो जीवंत असल्याचे लक्षात येताच त्याचा गळा चिरला. इतक्यावरच त्यांचे समाधान झाले नाहीतर त्यांनी त्याला जीवंत जाळले. एकाच व्यक्तीवर तीनवेळा निघृणपणे वार केल्याने नागपूरकर हादरून गेले आहेत. (man burned alive in ridhora of nagpur)
काटोल पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून पोलिसांनी आरोपी अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी यांना अटक केली आहे. अंगद कडुकर त्याच्या तीन मित्रांसह काटोलला जेवण करायला गेला होता. जेवणाआधी तिघे एका बंद असलेल्या झुणका भाकर केंद्रात मद्यपान करत असताना त्याच्या शेजारी आरोपी अक्षय चिगेरिया, मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी हेही मद्यपान करत बसले होते. त्याचवेळी अंगदसोबत आलेले त्याचे दोन्ही मित्र काही काम आल्याने थोड्या वेळासाठी तिथून गेले असताना अंगदच्या शेजारी दारू पीत असलेल्या तिन्ही आरोपींसोबत शाब्दिक भांडण झाले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी अंगदच्या टॅक्सीमध्येच त्याचे अपहरण केले आणि डोंगरगाव परिसरात नेऊन रस्त्यात अंगदला बेदम मारहाण केली. अंगदला मृत झाल्याचे समजून फेकून दिले. बेशुद्ध झालेल्या अंगदला मृत समजून तिन्ही आरोपींनी त्याला सावळी शिवारात निर्जन ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर अंगदची टॅक्सी निर्जन स्थानी उभी करून तिन्ही आरोपी आपापल्या घरी परतले. मुख्य आरोपी अक्षय चिगेरिया ने दारूच्या नशेत मी एकाची हत्या केल्याचे त्याच्या पत्नीला सांगितले. अक्षयच्या घाबरलेल्या पत्नीने दोन कौटुंबिक मित्रांना बोलावून नवरा बोलत असलेली बाब तपासण्यासाठी त्यांना अक्षयसोबत सावळी शिवार पाठवले. अक्षय चिगेरियाने त्यांना अंगद कडुकरला मारून फेकल्याचे ठिकाण दाखविले. तिथे आरोपींनी मृत समजून फेकलेला अंगद तेव्हाही जिवंत होता आणि वेदनेने विव्हळत होता.आरोपीने अंगदचा गळा चिरला. अक्षय चिगेरियासोबत तिथे गेलेले दोन्ही कौटुंबिक मित्र जखमी अंगदला रुग्णालयात नेण्याचा विचार करत असतानाच मुख्य आरोपी अक्षयने जवळचा चाकू काढून सर्वांसमोर जखमी अंगदचा गळा चिरला. डोळ्यासमोर अंगदची हत्या झाल्यानंतर अक्षयसोबत तिथे आलेले दोन्ही कौटुंबिक मित्र घाबरून तिथून पळून गेले. अंगद आता तरी मेला, असे समजून अक्षय चिगेरियाही तिथून निघून गेला.
अंगदच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या विचारातून त्याने मंगेश जिचकार आणि गणेश गोंडी यांना सोबत घेऊन दीड लिटर पेट्रोल आणि ट्रकच्या टायरची व्यवस्था केली. तिघे पेट्रोल आणि टायर घेऊन पहाटेच्या सुमारास पुन्हा घटनास्थळी पोहोचले. ते मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याची तयारी करताना त्यांना अंगद पुन्हा हालचाल करताना दिसला. आता तिघांनी कौर्याची परिसीमा गाठत अंगदच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळून टाकले. आरोपींच्या या तिसऱ्या आणि अत्यंत क्रुर प्रयत्नात अंगद कडुकरचा जीव गेला, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.