maryada purushottam ram idol ramayan ravan vadh lanka winning incident Sakal
नागपूर

Ayodhya Ram Mandir : मन राम रंगी रंगले : अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

लक्ष्मणा, जरी ही लंका सोन्याची बनली आहे तरी मला त्यात काहीच रूची नाही. कारण आपली जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा महान आणि प्रिय आहे. अशाप्रकारे रामाने विजय मिळविलेल्या लंकेला ती आपली नाही

सकाळ वृत्तसेवा

मर्यादा पुरुषोत्तम हा शब्द प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. त्यांनी आयुष्यभर आपली मर्यादा पाळली. त्यांच्या मर्यादेची प्रचिती रामायणातील विविध उदाहरणातून आपल्याला येते. त्यापैकी पुढील श्लोक सर्वात महत्त्वाचा वाटतो. रावणाचा वध करून प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवितात.

त्यावेळी सोन्याची लंका पाहून लक्ष्मण रामाला म्हणतात, सोन्याची लंका डोळे दीपवणारी आहे. त्यामुळे आपण आपले पुढचे वास्तव्य येथेच केले पाहिजे. त्यावर राम हसून म्हणतात,

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

अर्थात, लक्ष्मणा, जरी ही लंका सोन्याची बनली आहे तरी मला त्यात काहीच रूची नाही. कारण आपली जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा महान आणि प्रिय आहे. अशाप्रकारे रामाने विजय मिळविलेल्या लंकेला ती आपली नाही, हे तेव्हाच ठरवून टाकले आणि रितसर रावणाचे बंधू बिभीषण यांचा राज्याभिषेक केला.

  • रावणाच्या वधानंतर रामाने त्याच्या मृतदेहाकडे पाहून हा आता आपला शत्रू राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार झाले पाहिजे, असे बिभीषणाला सांगितले. त्यांच्या प्रथेनुसार जे काही विधिवत करता येईल, ते करण्याचा सल्ला राम त्यावेळी देतात. यातून त्यांची सदवृत्ती दिसून येते.

  • लंकेवर विजय मिळवून राम जेव्हा घरी परततात तेव्हा त्यांची आई कौसल्या त्यांना बिलगते आणि म्हणते, बेटा तू खूप मोठे कार्य केले आहेस. रावणाचा वध करून चारीदिशांमध्ये स्वतःचे नाव केले. त्यावर राम संयमाने त्यांना उत्तर देत म्हणतात, आई रावणाला मी मारलेच नाही. त्याला त्याच्यातील ‘मी’ने मारले. एवढी पराकोटीची संयमशीलता रामात भरली होती.

प्रभू रामाच्या प्रत्येक बोलण्यात कमालीचा मर्यादा भाव दिसून येतो. बोलण्यात, वागण्यात, ज्याच्या वाणीत मर्यादा आहे तोच प्रभू श्रीराम आहे. रामाची कृती प्रत्येकाने अंकीकारली तर नक्की रामराज्याचा दिवस दूर नाही.

- प्रा. मोहन खेडकर, व्हीएनआयटी नागपूर, माजी कुलगुरू, अमरावती विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT