file photo 
नागपूर

अध्यक्षांशिवाय होणार सभा

नीलेश डोये

नागपूर  : सर्वसाधारण सभेवरून जिल्हा परिषदेतील सत्तापक्षातील मतभेद समोर आलेत. क्वारंटाइन असल्याने सभा पुढे ढकलण्याचा प्रयत्न अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांचा सुरू आहे. परंतु, सभा पुढे ढकलण्यात कायद्याची अडचण आहे. त्यामुळे सभा होणारच असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सहा महिन्यांपासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नाही. त्यामुळे कामे प्रलंबित आहेत. सभा घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर मनपाने भट सभागृह देण्यास नकार दिला. आता वनामती येथे 24 जुलैला सर्वसाधारण सभा घेण्याचे निश्‍चित झालेले आहे.

जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव झाला. अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. त्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घरातच राहावे लागणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे त्यांना या सभेत हजर राहता येणार नाही. परिणामी, सभा पुढे ढकलण्याचा प्रयत्न अध्यक्षांकडून केला जात आहे.

उपाध्यक्ष, सभापती व विरोधी पक्ष सभा घेण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक अधिकाऱ्यांचीही सभेत येण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, सभा रद्द करण्यात आता कायद्याची अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 111 च्या तरतुदीनुसार एकदा नोटीस काढल्यानंतर सभा रद्द करता येत नाही. सभा सुरू करून नंतर तहकूब करता येते. तहकूब सभा नंतर घेता येते. परंतु, सभा घ्यावीच लागणार असल्याने सभा होणारच असल्याचे सांगण्यात येत आहे. 


उपाध्यक्षांकडे येणार धुरा 
गेल्या दशकातील अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच सभा होणार असल्याचे सांगण्यात येते. अध्यक्ष नसल्याने उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्याकडे सभेची धुरा येणार असल्याचे सांगण्यात येते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT