Metro news 
नागपूर

Metro : मेट्रो रेल्वेचा भार ग्रामीण जनतेवर; आता 'या' व्यवहारांवर एक टक्के अधिभार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, : मेट्रो रेल्वेचा विस्‍तार ग्रामीण भागापर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी हजारो कोटींचा खर्च येणार आहे. या खर्चाचा भार ग्रामीण जनतेला सहन करावा लागणार आहे. ग्रामीण भागातील जमिनीशी संबंधित व्यवहारावर एक टक्का अतिरिक्त अधिभार लावण्यात येत आहे.

मेट्रो टप्पा दोन अंतर्गत मेट्रोचा प्रवास ग्रामीण भागापर्यंत वाढवण्यात येणार आहे. मिहान ते एमआयडीसी, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान नदी, लोकमान्य नगर ते हिंगणा व प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी ६ हजार ७०८ कोटीच्या खर्चास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक भूसंपदनाची कार्यवाही होईल. महामेट्रोकडे याची जबाबदारी असून याच्या अंमलबजावणीसाठी एक उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली आहे. मुख्य सचिव याचे अध्यक्ष असतील.

शहरातील मेट्रो रेल्वे फायदेशीर ठरल्यावरून अनेदा प्रश्न निर्माण करण्यात आले. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत याचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सुरू करताना खर्चाचा भार येथील नागरिकांवर टाकण्यात आला. जमिनीच्या खरेदी विक्रीवर एक टक्का मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार लावण्यात आला होता.

२०१६ पासून हा अतिरिक्त अधिभार लावण्यात येत आहे. आता ग्रामीण भागापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येत आहे. तशी मागणीही समोर येत होती. ग्रामीण भागातील जमिनीशी संबंधित व्यवहारावर एक टक्का अधिभार लावण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. या अधिभारामुळे ग्रामीण भागातील जमिनीशी संबंधित व्यवहार महागतील. याचा भार येथील नागरिकांना उचलावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT