Bharosa Cops Hub sakal
नागपूर

Nagpur News : ‘भरोसा’ने सुवर्णमध्य साधल्याने पत्नीला मिळाला पतीच्या संपत्तीत वाटा

अनेक वर्षे गोडी गुलाबीने संसार सुरु होता. मात्र कुणाची नजर लागली. एक दिवस मोबाइलवर आलेल्या मॅसेजमुळे पत्नीच्या पायाखालची जमिनच सरकली.

मंगेश गोमासे

नागपूर - अनेक वर्षे गोडी गुलाबीने संसार सुरु होता. मात्र कुणाची नजर लागली. एक दिवस मोबाइलवर आलेल्या मॅसेजमुळे पत्नीच्या पायाखालची जमिनच सरकली. तीने काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला अन दोघांचीही ताटातुट झाली. काही दिवसानंतर मुलीच्या भविष्यासाठी तिने संपत्तीवरचा अधिकार मागितला. अन तो सुद्धा मुलीच्या प्रेमापोटी राजी झाला. ‘बेटी’साठी ‘भरोसा सेल’ने समुपदेशनातून ‘सुवर्णमध्य’ साधला. नाते तुटले असले तरी मनाचे धागे मात्र मुलीच्या प्रेमासाठी जुळले असल्याचा अनुभव पोलिसांना आला.

एका लग्नाची ही गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी सुदेश (बदललेले नाव) याचे सुमती (बदललेले नाव) हिच्याशी अरेंज मॅरेज झाले. दोघांनीही मुल होत नव्हते. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून सुमतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. संसारवेलीवरील मुलगी सात वर्षांची झाली. सुखाचा संसार सुरू असताना एक दिवस सुमतीच्या हाती सुदेशचा मोबाइल लागला. सहज पाहता पाहता तीच्या नकळत धक्कादायक वास्तव समोर आले.

सुरवातीला पत्नीचा विश्‍वास बसेना. त्याच्या मोबाईलमधून किराणा दुकानात काम करणाऱ्या वयोवृद्धाशी असलेले असभ्य नाते असल्याची बाब समोर आली. तिला जबर धक्का बसला. त्यातून सावरत नाही तोच एचआयव्हीने सुदेशला विळख्यात घेतल्याचा दुसरा धक्का तिला बसला. त्यामुळे तत्काळ स्वतःची टेस्ट सुमतीने करवून घेतली. मात्र, सुदैवाने ती निगेटीव्ह होती. तिला दिलासा मिळाला.

मात्र, आता आता आयुष्याची जोखीम नको, या विचाराने सुदेशसोबतचे नाते तोडण्याची गाठ मनाशी बांधली. मुलीला घेऊन थेट माहेर गाठले. मात्र जगण्याचे साधन नाही, मुलीच्या शिक्षणासाठी आणि भावी आयुष्यासाठी पैसा हवा असल्याने तिने सुदेशकडे संपत्तीची मागणी केली.

सुदेशच्या नातेवाईकांनी संपत्तीतील वाटा देऊ नको असे सांगितले. त्यासाठी प्रयत्न देखील केले. मात्र या दरम्यानच्या काळात हे प्रकरण ‘भरोसा सेल’कडे आले. भरोसा सेलमधील समुपदेशक प्रेमलता पाटील यांनी दोघांचेही समुपदेशन केले. त्यातून उत्तम मार्ग निघाला.

मुलीवर प्रेम करणारा बाप...

समुपदेशनात सुमती ठाम होती. दोघांनीही आपल्या वाटा वेगवेगळ्या केल्या. नाते तुटणे निश्‍चित होते. मात्र, पत्नीला हक्क मिळावा यासाठी पती सुदेशचे समुपदेशन करण्यात आले. तब्बल सहा फेऱ्यानंतर अखेर समुपदेशकर्त्यांना यश आले. नातेवाईकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत, मुलीच्या प्रेमापोटी सुदेशने आपल्या संपत्तीतील वाटा देण्याच्या निर्णय घेतला. या निर्णयामुळे पत्नी सुमती आणि मुलीचे भविष्यातील जगणे सुकर झाले. हा आनंददायी शेवट झाल्यामुळे ‘भरोसा’ सेलतर्फे पतीपत्नीचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT