Mocca on ShahRukhs butcher gang
Mocca on ShahRukhs butcher gang  sakal
नागपूर

नागपूर : शाहरूखच्या कसाई टोळीवर मोक्का

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नंदनवन हद्दीतील कुख्यात गुंड शाहरुख ऊर्फ कसाई टोळीवर नंदनवन पोलिसांनी मोक्काची कारवाई करून त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. शाहरुख ऊर्फ कसाई शेख अक्रम (२४, हसनबाग), मो. नदीम ऊर्फ नद्दू मो. इब्राहिम (२२, हसनबाग), शेख जावेद ऊर्फ गोलू सय्यद अक्रम (१९, हसनबाग छोटी मशिदजवळ), शेख ऐफाज शेख अस्लम (२३, संजयनगर), शेख बशीर शेख अकील (१९, चांदनी चौक मशिदजवळ हसनबाग), शहेबाज खान शेर खान (२०, हसनबाग), वसंता ऊर्फ विक्की योगराज फरकुंडे (२०, नंदनवन झोपडपट्टी), सोहेल अली हसन अली (२०), तन्वीर हसनअली (२०) आणि फरदीन फिरोजखान (२०) अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.(Nandanvan police cracks down on notorious gangster Shah Rukh)

काही दिवसांपूर्वी गुंड वसंता ऊर्फ विक्की याची दुचाकी गणेश कळसाईत या गुन्हेगाराने घेतली होती. वसंता त्याला दुचाकी मागत होता. त्यावरून त्यांचा वाद सुरू होता. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास गणेशचा मित्र इरफान ऊर्फ भोला रऊफ खान हा त्याच्या मित्रासोबत बसला होता. सर्वच आरोपी इरफानच्या घरी आले. आरोपींनी धारदार शस्त्राने इरफानच्या पोटावर, डोक्यावर मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला जगनाडे चौकातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.(admitted to a private hospital at Jagannade Chowk in critical condition)

याप्रकरणी नंदनवनचे ठाणेदार अजय नगराळे यांच्या पथकाने गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली होती. शाहरुख व त्याच्या टोळीतील सदस्यांची दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई करून त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अजनी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त गणेश बिरादार पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT