mundhe defeated Corona 
नागपूर

कोरोनावर मात केल्यानंतर मुंढेचा टोला कुणाला?

राजेश प्रायकर

 नागपूर : कोरोना पॉजिटिव्ह आढळून आल्यानंतर गेल्या १३ दिवसांपासून विलगीकरणात असलेले महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अहवाल निगेटिव्ह आला. कोरोनावर मात करताच त्यांनी फेसबुक अकाऊंटवर ‘समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे`, असे नमुद केले. त्यामुळे मुंढेंचा हा टोला नेमका कुणाला? असा प्रश्न सोशल मिडियावर विचारला जात आहे. 

शहरात कोरोनाविरुद्ध लढ्यात महापालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी जोमाने काम केले. यातूनच त्यांना २४ ऑगस्टला कोरोनाची बाधा झाली. तेव्हापासून ते विलगीकरणात आहेत. आज त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, पुढील चार दिवस ते विलगीकरणातच राहणार आहेत.

अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक व ट्‍विटर अकाऊंटवरून चाहत्यांना दिली. विलगीकरणात गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. त्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य झाल्याचे त्यांनी सोशल मिडियावरील पोस्टमध्ये नमुद केले आहे.

सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि शुभेच्छांच्या जोरावर कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले. समाजातील दुष्प्रवृत्ती आणि कुविचारांवर मात करण्यासाठीसुद्धा या गोष्टी आवश्यक आहे, असेही त्यांनी नमुद केले. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
 
समविचारी व्यक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन
त्यांनी सकारात्मकता रुजविण्यासाठी समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊ या, असेही आवाहन केले. त्यांच्या या आवाहनातून ते सत्ताधाऱ्यांविरुद्ध मोट बांधण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्रा

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT