murder murder
नागपूर

अभ्यासात ‘ढ’ असलेला मितेश एकाच वेळी फिरवायचा चार प्रेयसी

मितेश हा अभ्यास आणि नोट्स देण्याचा बहाणा करून चारही प्रेयसीला घरी बोलवत होता

अनिल कांबळे

नागपूर : अभ्यासात ‘ढ’ असलेला मितेश मात्र रंगीला होता. चार गर्लफ्रेंडसोबत कायम संपर्कात राहून मौजमजा करीत होता. त्याचे स्वप्न विदेशात जाऊन मौजमस्ती (Dream of going abroad) करायचे होते. परंतु, आजीमुळे ते स्वप्न धुळीस मिळाले. याचा त्याच्या मनात राग होता. त्या रागाच्या भरात संधी साधून आजीचा काटा काढला (murder), असे सूत्रांनी सांगितले.

मौजमस्ती करण्याचा शौक असलेल्या मितेशला चार प्रेयसी (girlfriend) होत्या. त्यापैकी एक रामटेकमध्ये राहत होती. आई-वडील डॉक्टर असल्यामुळे ते सकाळीच हॉस्पिटलला निघून जात होते आणि थेट सायंकाळी परतत (Neglect of parents) होते. त्यामुळे वरच्या माळ्यावर मितेश एकटाच राहत होता. तर तळमजल्यावर आजारी आजोबा आणि आजी राहत होती.

मितेश हा अभ्यास आणि नोट्स देण्याचा बहाणा करून चारही प्रेयसीला घरी बोलवत होता. परंतु, त्या प्रेयसींना आजी दरवाज्यातच अडवून चौकशी करीत होती. त्यानंतर मितेशच्या खोलीत वारंवार जाऊन तरुणीवर लक्ष ठेवत होती. त्यामुळे आजी ही तिला प्रेमात अडसर ठरत होती. त्यामुळे तो आजीच्या रोखटोकला कंटाळला होता. त्यामुळे आजीचा काटा काढण्याचा प्लान त्याने केला होता.

‘गॅंगस्टर’ कॉल मी

मितेशला दारूचे व्यसन होते. तसेच तो नियमित जिमला जात होता. जिममुळे तो स्टेरॉईडचे घेत असावा. बॉडीबिल्डर असलेल्या मितेशला त्याची प्रेयसी प्रेमाने ‘गॅंगस्टर’ म्हणत होती. मितेशच्या प्रेयसीने वारंवार कॉल केला. परंतु, त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यादरम्यान तो आजीचा खून करण्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याच्या एका प्रेयसीने त्याला ‘गॅंगस्टर, कॉल मी.’ असा मॅसेज टाकला.

आई-वडिलांचा विश्‍वासच बसेना

डॉक्टर दाम्पत्याला एकुलता असलेला मितेश थेट आजीचा खून (Grandmother's murder) करेल, यावर आई-वडिलांचा विश्‍वास बसत नव्हता. मितेश असे करूच शकत नाही, यावर आई ठाम होती. शेवटी पोलिसांनी तिची आणि मितेशची भेट घालून दिली. त्यावेळी मितेशने आजीचा खून केल्याची कबुली दिली. ‘बाबा... आईची काळजी घ्या’ एवढे बोलून मितेश ढसाढसा रडायला लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT