नागपूर

आयुष्यभर ज्या सुऱ्याने कापले मटण तोच सुरा ठरला मृत्यूस कारणीभूत

अनिल कांबळे

नागपूर : आजूबाजूला मटणचे दुकान (Meat shop) लावणे आणि भाव कमी करून ग्राहक वळविल्याच्या कारणावरून दोन विक्रेत्यांमध्ये वाद झाला. या वादातून जगदीश मदने (४५, रा. पाटनकर चौक) या मटण विक्रेत्याचा खून (The murder of a meat seller) करण्यात आला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. राजू कटारे आणि कुणाल बावणे अशी आरोपींची नावे आहेत. (Murder of a meat seller during a commercial competition in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश मदने आणि राजू कटारे हे नातेवाईक आहेत. दोघेही पाटणकर चौकात मटणचे दुकान लावतात. जगदीशचे दुकान जरीपटका हद्दीत तर राजूचे दुकान कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत होते. राजूच्या दुकानाच्या बाजूलाच जगदीशच्या भावाचे मटणाचे दुकान होते. जगदीशचा भाऊ आणि राजूचे दुकान शेजारी असल्याने ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी मटणाचे भाव कमीजास्त करीत होते.

जगदीशच्या भावाच्या दुकानात कमी किमतीत मटण विकले जात असल्यामुळे ग्राहकांची गर्दी असायची. मटणचे भाव पाडण्यावरून जगदीशचा भाऊ आणि राजू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच कारणावरून रविवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. वाद करून आरोपी निघून गेले होते.

दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आरोपी राजू, कुणाल, विक्की आणि बंटी हे जगदीशच्या दुकानात आले. पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत राजू आणि कुणाल यांनी मटण कापण्याच्या सुऱ्याने जगदीशच्या कमरेवर वार करून रक्तबंबाळ केले. जगदीशचा भाचा शुभम शेंडे हा मधात पडला असता आरोपींनी त्याला मारहाण करून जखमी केले. गंभीर अवस्थेत जगदीशला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जरीपटका पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त निलोत्पल, जरीपटक्याचे पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे आपल्या सहकार्ऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहिम राबवून राजू आणि कुणाल यांना अटक केली. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

(Murder of a meat seller during a commercial competition in Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT