Nagpur 90kg ganja seized from Visakhapatnam Express Action of RPF squad esakal
नागपूर

नागपूर : विशाखापट्टनम एक्स्प्रेसमधून ९० किलो गांजा जप्त

सात तस्कर पोलिसांच्या हाती यात २ महिलांचा समावेश : RPF पथकाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधून ९० किलोचा गांजा आरपीएफच्या पथकाने पकडला. सात तस्कर पोलिसांच्या हाती लागले असून यात २ महिलांचा समावेश आहे. रेल्वेने गांजाची तस्करी करण्याच्या घटना यापूर्वी सुद्धा उघडकीस आल्या आहेत. ही कारवाई नागपूर रेल्वे स्थानकावर दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. २०८०५ विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्सप्रेसमध्ये आरपीएफचे पथक होते. डब्याची तपासणी करीत आरपीएफ जवान बी-१ कोचमध्ये आले.

पथकाला उग्र दर्प आल्याने ते सज्ज झाले. डब्यातील प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना काही प्रवाशांवर संशय बळावला. त्यांची चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हिसका दाखविताच गांजाची खेप घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे काही साथीदार एस-५ कोचमध्येही होते. त्यांनाही ताब्यात घेतले. एकूण ८ ते ९ बॅग जप्त केल्या.

फलाटावर सर्व बॅग उतरवून सखोल चौकशी केली. दरम्यान वेळ झाल्याने गाडी निघाली. संपूर्ण गाडीची तपासणी करायची असल्याने आरपीएफ जवान नागपूर ते ईटारसी पर्यंत तपासणीसाठी रवाना झाले. इकडे पाच पुरुष आणि दोन महिला असे सात लोकांना आरपीएफ ठाण्यात आणले. त्यांच्या जवळ ८ ते ९ बॅग जप्त केल्या. तपासणी केली असता बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आढळला. जवळपास ९० किलो गांजा म्हणजे ९ लाख रुपये किमतीचा गांजा असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Miracle: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT