nagpur accident  sakal
नागपूर

Nagpur Accident : मी नव्हे, माधुरी सारडाने मर्सिडीज चालवली; नागपूर अपघातात नवा ट्विस्ट

रितू मालूचा पोलिसांना दिलेल्या पत्रात उल्लेख; उच्च न्यायालयाला माहिती

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज कार चालवून दोघांचा बळी घेतल्याचा आरोप असलेल्या ऋतिका ऊर्फ रितू दिनेश मालूने (वय ३९, रा. देशपांडे लेआउट) त्या रात्री मी नव्हे तर माधुरी सारडा कार चालवित होती, अशी माहिती पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केली आहे.

तसेच, असे कृत्य करून तिने पोलिसांची दीशाभूल केली आहे. तिने तपासात सहकार्यही केलेले नाही. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.

ही घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू व माधुरी शिशिर सारडा (वय ३७, रा. वर्धमाननगर) या दोघी सीपी क्लबमध्ये गेल्या. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर मर्सिडिजने (एमएच ४९ : एएस ६१११) दोघी वर्धमाननगरकडे जायला निघाल्या.

रामझुल्यावर रितूने कारचा वेग वाढविला व मोपेडला (एमएच ३७ : क्यू २९४८) जोरदार धडक दिली. यात मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक, मोमिनपुरा) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. अवस्थी चौक, जाफरनगर) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितूला अटक केली, तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. पुढे तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी रितूने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने अंतरिम मंजुरी दिली होती. तो फेटाळण्यात आला.

त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी यावरील निर्णय राखून ठेवला. मालूतर्फे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.

२४० एमएल नव्हे, ३० एमएल मद्य प्यायले

रितू मालूने मद्य प्राशन केले. मात्र, केवळ तीस एमएल मद्य प्राशन केले असून कायद्यानुसार एका ठराविक मर्यादेत इतके मद्य प्राशन करून गाडी चालविता येते. ३० एमएल त्या मर्यादेतमध्ये येते. तसेच, त्यांनी संपूर्ण तपासात सहकार्य केले आहे.

त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मान्य करण्यात यावा, असा युक्तिवाद मालूतर्फे करण्यात आला. परंतु, मालूने ३० नव्हे तर २४० एमएल मद्य प्यायले होते, अशी माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयाला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT