Akola Mahavitaran Esakal
नागपूर

Akola Mahavitaran:वीज ग्राहकांकडे थकले ११६ कोटी, वसुलीसाठी महावितरण मैदानात; आठ हजारांवर ग्राहकांचा पुरवठा खंडित

Mahavitaran Disconnects Electricity Supply: अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत असलेल्या विजबिलाच्या १६६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम अधिक तीव्र केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akola Mahavitaran Disconnects Electricty of 8000 Customers: अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत असलेल्या विजबिलाच्या १६६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम अधिक तीव्र केली आहे.

वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या आठ हजार १०३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी थकीत असलेली वीजबिलाची संपूर्ण रक्कम भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण अकोला परिमंडलातील कृषी ग्राहक वगळून उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील सुमारे १३ लाख ७४ हजार ७९७ ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक ९ लाख ५२ हजार ५७५ ,वाणिज्यिक ७० हजार ६७१, औद्योगिक २५ हजार ३०९ आणि इतर वर्गवारील १९ हजार ५७५ ग्राहकांचा समावेश असून त्यांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. (Latest Marathi News)

परंतु परिमंडळात विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २४ फेब्रुवारी २०२४ अखेर १६६ कोटी रुपये वीजबिलाचे थकल्यामुळे महावितरणची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे वसुलीसाठी महावितरणने मोहीम अधिक तीव्र केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या मोहिमेत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे.

अशी आहे थकबाकी
थकबाकीनुसार विचार केला तर परिमंडलात विविध वर्गवारीतील १६६ कोटी १६ लाख रूपयाच्या थकबाकीमध्ये १२९ कोटी २८ लाखाची थकबाकी घरगुती ग्राहकांची आहे. वाणिज्यिक ग्राहकांकडे १५ कोटी २ लाख, औद्योगिक ग्राहकांकडे १२ कोटी २२ लाख आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकाकडे ९ कोटी ६३ लाख वीज बिलाचे थकले आहे.

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात असतानाही वसुलीचे असलेले व्यस्त प्रमाण बघता थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मोहीम सुरू केल्यापासून आतापर्यंत ८ हजार १०३ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. फेब्रुवारीचे तीन दिवसासाठी आणि मार्च महिन्याकरीता प्रत्येक कर्मचाऱ्यांना थकीत वीजबिल वसुलीसोबत वीज पुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार भरणा केंद्रे
महावितरणने वीजबिल वसुली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मोहिमेत वीजबिल न भरणाऱ्या त्या प्रत्येक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार आहे. सोबत ग्राहकांना महावितरणची कटू कारवाई टाळता यावी यासाठी महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे ३१ मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्याही दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे.

याशिवाय ग्राहक महावितरण मोबाईल ॲप, महावितरण संकेतस्थळ यावरूनही वीजबिल भरू शकतात आणि ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे मिळणारी सवलत घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT