कोठडी sakal
नागपूर

Nagpur : लाच मागणाऱ्यांना चार दिवसांची कोठडी

आमदाराच्या नावाने आरोपींनी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आमदाराच्या नावाने आरोपींनी लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ लाख रुपये लाच स्वीकारताना मंगळवारी (ता.२८) अटक केली. याप्रकरणी दोन महिला अधिकाऱ्यांनी तक्रा दिली होती. दरम्यान दोघांनाही बुधवारी (ता.२९) जिल्हा सत्र न्यायालयासमोर सादर केले असता, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान आता तपासात बऱ्यात तथ्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

दिलीप खोडे (वय ५० रा. ठाणे ) आणि त्याचा साथीदार शेखर भोयर रा. अमरावती (खाजगी इसम) यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. राज्य सरकारच्या कार्यालयात असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांनी विधानपरिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडे तक्रार केली होती.

दरम्यान दिलील खोडे याने ज्याच्या विरुद्ध महिलांनी तक्रार केली, त्याच्याशी संपर्क साधला. तसेच विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित न करणे व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता आरोपींनी दोन प्रकरणाचे प्रत्येकी ५० लाख रुपये असे एकूण १ कोटी रुपयांची मागणी केली. नंतर हे प्रकरण २५ लाखांवर निश्‍चत झाले.

मात्र, तक्रारदार महिलांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर पथकाने सापळा रचला आणि दोघांनाही अटक केली. यावेळी दोघांनाही जिल्हा सत्र न्यायालयासमोर सादर केले असता, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खोडे हा यापूर्वी राजकीय नेत्याकडे काम करीत असल्याने त्याने हे कुणाच्या म्हणण्यानुसार केले वा त्याचा पाठीराखा कोण? याचा शोध पोलिसांद्वारे घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT