Nagpur  Esakal
नागपूर

Nagpur Firing: जुन्या वादातून कुख्यात गोवंश तस्करावर गोळीबार, गोवंश विक्रीतून कपिलनगरात ‘टोळीयुद्ध’, एक जण जखमी

नागपुर शहरात लपूनछपून गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन टोळीमध्ये जुन्या वादातून टोळीयुद्ध भडकले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Gangwar Firing on Beef Smuggler: नागपुर शहरात लपूनछपून गोवंशाची तस्करी करणाऱ्या दोन टोळीमध्ये जुन्या वादातून टोळीयुद्ध भडकले आहे. त्यातून शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगारनगरात सोनू बंदर ऊर्फ शेख इमरान याच्या टोळीवर शेख शादाब वल्द शेख गुलाब याच्या टोळीने हल्ला करीत गोळीबार केला. यामध्ये सोनू बंदरचा मित्र जखमी झाला.

अमजद शेख वल्द शब्बीर शेख (वय ३० रा. यशोधरानगर) असे जखमीचे नाव आहे. शेख शादाब वल्द शेख गुलाब, वय २७, रा. अन्सारनगर), सोहेल बावला अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू बंदर ऊर्फ शेख इमरान अब्दुल सत्तार शेख (वय २३, रा. कामगार नगर, नारी रोड, कपीलनगर) हा अमजद शेख वल्द शब्बीर शेख, वसिम नसिम खान, आरान वल्द मख्तार शेख यांच्यासह मोमीनपुऱ्यातून नमाज अदा केल्यावर कामगारनगर येथे आपल्या मोठ्या भावाकडे येत होता.

दरम्यान तो पेट्रोल भरण्यासाठी कामठी मार्गावरील मोहम्मद अली पेट्रोल पंपावर गेला. पेट्रोल भरून झाल्यावर ते निघत असताना कामगारनगराकडे निघाले. तेव्हाच मागून शादाबसह सहा ते सात जण इनोव्हा कारमधून त्याच्या जवळ आले. त्यांच्याजवळ पिस्तुलासह तलवारी आणि इतर घातक शस्त्र होते. दरम्यान खाली उतरून शादाबने सोनूवर हल्ला केला. (Latest Marathi News)

असा आहे वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब आणि सोनू बंदर हे काही महिन्यांपूर्वी एकाच टोळीत गोवंश तस्करीचे काम करायचे. मात्र, त्यांची भांडणे झाल्याने ते वेगळे झाले. १० मार्चला मौदा आणि कळमेश्‍वर ठाण्याच्या हद्दीत गोवंश तस्करी करताना वाहन पकडण्यात आले. ते वाहन आणि माल शादाब याचा असल्याचे आढळले. याप्रकरणी शादाबसह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल झाले.

त्यात सोनू विरा नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. याबाबत सोनू बंदर याने टीप दिल्याची माहिती शादाबला कळली. मात्र, त्यात सोनू बंदरचा मित्र सोनू विरा हा शादाबसाठी काम करीत असल्याचे कळल्याने त्याला भेटण्यासाठी सोनू बंदर आणि त्याचे साथीदार गेले होते. ही बाब शादाबला माहिती पडली. त्यामुळे सोनूचा गेम करण्याच्या विचाराने त्याने पहाटे साथीदारांसह त्याचावर हल्ला केला. त्यात सोनू बंदर थोडक्यात बचावला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT