Nagpur
Nagpur Sakal
नागपूर

नागपूर : सुनील केदारांना टक्कर देण्यासाठी भाजप सरसावली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कृषी (Agriculture) उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या (Election) हालचाली वाढल्या असून अनेक वादग्रस्त व्यापाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पॅनेल तयार करण्यासाठी सर्वांना कसरत करावी लागत आहे. २४ सप्टेंबरला (September) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आहे.

नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे पशु संवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांचाच अधिक भरणा आहे. यावेळी प्रथमच भाजप त्यांच्या समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक लढण्यास इच्छुकांमध्ये अनेक व्यापाऱ्यांवर भ्रष्टाचार, जमीन हडपणे, बाजार समितीच्या मालमत्तेचा दुरुपयोग करण्याचे आरोप आहेत. समितीच्या संचालक मंडळात ग्रामीण भागातील प्रतिनिधींचा दबदबा तुलनेत अधिक आहे. १७ संचालकांपैकी तीन सदस्य शहरातील असतात. यातही दोन व्यापारी आणि एक हमाल प्रवर्गातून निवडून द्यायचा आहे. उर्वरित सर्व सदस्य ग्रामीण भागातील विविध सोसायट्या, ग्राम पंचायतीशी संबंधित आहेत.

बाबासाहेब केदार, सुनील केदार यांचेच बाजार समितीवर वर्चस्व असल्याने आजवर इतर राजकीय पक्ष या निवडणुकीकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने यात लक्ष घालणे सुरू केले. समितीत शेतकऱ्यांचा वाटा वाढावा याकरिता विधेयकसुद्धा पारित केले होते. मात्र महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर हे विधेयक गुंडाळून ठेवण्यात आले आहे. सध्या भाजपने या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यावर सोपविली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : राजस्थानने नाणेफेक जिंकली; संजू प्ले ऑफचा खुट्टा अजून बळकट करण्यासाठी सज्ज

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : प्रियांका गांधींना मराठवाड्याच्या विकासाचा विसर; शब्दही काढला नसल्याने मतदारांचा हिरमोड

SCROLL FOR NEXT