ZP Election : आलोंड्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत

सर्व पक्षातील उमेदवारी गुलदस्तात; उद्या होणार चित्र स्पष्ट
ZP Election : आलोंड्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत
ZP Election : आलोंड्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. यात संपूर्ण पालघर जिल्हाचे लक्ष लागून राहिलेल्या विक्रमगड तालुक्यातील आलोंडा गटासाठी 1 जागेसाठी निवडणूक होत आहे. मात्र अधिकृतरीत्या या गटासाठी कुठल्याही पक्षाच्या उमेदवारांने आपला उमेदवारी अर्ज भरलेला नसल्याने. तिकिटासाठी उमेदवारांची भाऊगर्दी पहावयास मिळत आहे.

आलोंडा गटामधुन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष निवडून आल्या नंतर त्यांना पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले होते. असे असतांना ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टा कडून रद्द झाल्या नंतर या जागेवर पुन्हा निवडणुक लागल्याने. सर्वच पक्ष या जागेवर जोर लावणार असल्याचे चित्र आहे. निलेश सांबरे ही निवडणुक लढतात की नाही हे सर्व गुलदस्तात आहे. या बाबत त्याची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.

आघाडी होण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेना,काँग्रेस, भाजपा,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपले उमेदवार या जागे साठी उतरवण्याच्या तयारीत असुन या बाबत गेल्या दोन दिवसापासुन या पक्षाच्या बैठका झाल्याचे समजते आहे. पालघर जिल्हा परिषद मध्ये महविकास आघाडीची सत्ता असली तरी या आलोंडा गटासाठी सर्वच पक्ष आपले उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. परंतु खरे चित्र उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

ZP Election : आलोंड्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत
सुखजिंदर रंधवांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ? अधिकृत घोषणा बाकी

आलोंडा गटाकडे पालघर जिल्हाचे लक्ष :

आलोंडा गटातुन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे निवडून आले होते. या गटात जिजाऊ संघटनेची मोठी ताकद आहे. या गटातील अनेक ग्रामपंचायतवर जिजाऊ संघटनेचे सरपंच निवडून आले होते. त्यातच या गटात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जिल्हा परिषदेचे आताचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे राहत असल्याने. या गटाच्या निवडणुकीकडे साऱ्या पालघर जिल्हाचे लक्ष लागून राहिले आहे.

ZP Election : आलोंड्यातील सर्वच पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत
उत्तराखंडमध्ये 'आप'चे सरकार आल्यास स्थानिकांना 80 टक्के आरक्षण

आघाडी बाबत वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल परंतु सध्या आलोंड गटासाठी आमच्या पक्षा कडून 2-3 उमेदवार इच्छुक असुन आमची निवडणुकी बाबत तयारी सुरु आहे.

-सागर आळशी (शिवसेना तालुका प्रमुख, विक्रमगड)

काँग्रेसपक्षा कडुन या गटासाठी दोन उमेदवार इच्छुक आहे. या उमेदवारांचे काँग्रेस पक्षाकडून उद्या आम्ही अर्ज भरणार आहोत.

-घनःश्याम आळशी (विक्रमगड तालुका अध्यक्ष, काँग्रेस पक्ष)

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा कडून आलोंडा गटाच्या निवडणुकीसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. उद्या अर्ज भरणार आहोत.

-कॉ. किरण गहला (तालुका सचिव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)

या गटात निवडणुक उमेदवारा बाबत पुढील निर्णय श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित घेतील. आमच्या संघटनेचे मतदान या गटासाठी निर्णायक ठरेल.

-तुषार सांबरे (पालघर जिल्हा उपाध्यक्ष, श्रमजीवी संघटना)

आलोंडा जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही पूर्ण ताकतीने निवडणुक लढणार आहोत. आमच्या पक्षा कडून या गटात उमेदवारीसाठी चार उमेदवार इच्छुक आहेत.

-जयप्रकाश आळशी (भाजपा विक्रमगड तालुका अध्यक्ष)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com