Breast cancer sakal
नागपूर

Nagpur : तिशीतील तरुणींना ब्रेस्ट कॅन्सरची जोखीम

२२ महिलांत एकीला आजाराचा विळखा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार १० महिलांमध्ये एक तर आपल्या देशात २२ महिलांमध्ये एक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती कॅन्सररोग जागृती तज्ज्ञ डॉ. रवि देशमुख यांनी दिली.

घरासाठी महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तर दुसरीकडे महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणी धुम्रपानासह ड्रग्सच्या आहारी गेल्याने तिशीत कॅन्सरच्या विळख्यात अडकत आहेत. यामुळे यांच्या मनात आरोग्य जागृतीची जाणीव उत्पन्न करणे महत्त्वाचे आहे. कॅन्सर झाला हे कळल्यानंतर महिला खचून जातात. त्यानंतर नकारात्मक विचार सुरू करतात. आनुवंशिकतेने ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण ब्रेस्ट कॅन्सरच्या तुलनेत अलीकडे वाढत आहे. एकूण कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये २८ टक्के ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण आहे. महिलांच्या ब्रेस्टमध्ये असलेली प्रत्येक गाठ कॅन्सरची नसते. हे महिलांना समजाऊन सांगायला हवे. परंतु ही गाठ नेमकी कशाची आहे, याचे निदान योग्य वेळेत झाले नाही, तर कॅन्सरमध्ये ही गाठ बदलू शकते, असे डॉ. देशमुख म्हणाले.

  • कारणीभूत घटक

  • व्यायामाचा अभाव

  • बैठी जीवनशैली

  • चुकीची जीवनशैली

  • अयोग्य आहार

  • तंबाखू, दारूचे सेवन

  • हारमोनयुक्त औषधं

  • ब्रेस्टवर केलेली शस्त्रक्रिया

  • उशिरा लग्न

  • उशिरा मुल होण्याचा पायंडा

  • दैनंदिन ताण-तणाव

  • ब्रेस्ट कॅन्सरचा प्रभाव अलीकडे पंचेविशीतील तरुणींमध्येही दिसू लागला आहे. ही गंभीर बाब आहे. याला कारणीभूत महाविद्यालयीन उंबरठ्यावरील अनेक मुली तंबाखू, सिगारेट, बिअर,दारूसह ड्र्ग्सच्या च्या आहारी गेल्या असल्याचे चित्र समाजात आहे. चाळिशीनंतरच मॅमोग्राफी करावी. ब्रॉचा वापर कमी करावा. स्वतः महिलांना स्वतःचे ब्रेस्ट तपासावे. हार्मोन्स युक्त गोळ्यांचा वापर टाळावा.

    -डॉ. रवि देशमुख,नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कंटेनरने २२ वाहनांना फरफटत नेले अन्...

IND vs NZ, 4th ODI: न्यूझीलंड ऑलआऊट, तरी भारतासाठी विजय कठीण! आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं, ते घडवण्याची संधी

'त्या सेटवर नेमकं काय घडलं, मला सगळ्यांनी सांगितलं'; नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरणावर महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य

श्रीवर्धनला 'ब्ल्यू फ्लॅग'! सागरी किनाऱ्याला जागतिक स्तरावर नवी ओळख; रोजगाराची संधी

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँक अध्यक्षांची निवड बुधवारी; महेंद्र लाड, विश्वजित कदम, देवराज पाटील शर्यतीत

SCROLL FOR NEXT