Taxi Car Stolen By Passenger in Nagpur: आंध्रप्रदेशात जाण्यासाठी ओला कॅब बुक करून शहरात फिरवित, त्याचे वाहन आणि मोबाइल घेऊन पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने आंध्रप्रदेशातून अटक केली.
कानाकुर्ती पुर्णा चंद्राराव वल्द केसवय्या (वय ३७, रा. होम्सकेप्स रिंग व्युह अपार्टमेंट, के.व्ही.आर वल्ली रोड, दुडीगल, सायबराबाद तेलंगना), पुष्परेड्डी कार्तिक वल्द पुष्परेड्डी सारकेश्वरराव (वय ३०, रा. बोलाराम, हैद्राबाद, तेलंगना) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला राहुल राजेश शर्मा (वय २४, रा. सुंदरनगर, पारडी) या ओला कॅब चालकाची कार (एम.एच ४९ बी.झेड १४२१) दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोघांनीही तेलंगना जाण्यासाठी ऑनलाइन बुक केली.
त्याला शहरात फिरविले. त्यानंतर नंदनवन येथील संग्राम बारमध्ये बसले. राहुलला नशा चढल्यावर उतरवून त्याचा मोबाइल आणि कार घेऊन पसार झाले. शुद्धीवर येताच, त्याने कोतवाली पोलिसांकडे तक्रार दिली. लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते आंध्रप्रदेशात असल्याची माहिती सायबर सेल आणि पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या पथकाला मिळाली. आरोपींना अटक करीत, कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.